IND vs SA 1st T20I : टीम इंडियाच्या या दोघांमध्ये नंबर 1 होण्यासाठी रस्सीखेच
India vs South Africa T20i Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत टीम इंडियाच्या 2 खेळाडूंमध्ये क्रिकेट चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये पराभूत केल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 8 नोव्हेंबरपासून 4 सामन्यांच्या टी 20I मालिकेला सुरुवात होत आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत टीम इंडियाचं तर एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. या पहिल्याच सामन्यापासून टीम इंडियाच्या 2 खेळाडूंमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. आपल्याच सहकाऱ्याला मागे टाकण्यासाठी या दोघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या या दोघांमधून आता कोण यशस्वी ठरतो? हे पहिल्या सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
अर्शदीप आणि हार्दिक या दोघांकडे या 4 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाकडून महारेकॉर्ड उद्धवस्त करण्याची बरोबरीची संधी आहे. युझवेंद्र चहल याने टीम इंडियासाठी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तर आता हार्दिक आणि अर्शदीप या दोघांकडे चहलला मागे टाकण्याची बरोबरीची संधी आहे. त्यामुळे आता या मालिकेतील सर्वच सामन्यात या दोघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार हे निश्चित आहे.
युझवेंद्र चहल याने 80 टी 20 सामन्यांमध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी भुवनेश्वर कुमार आहे. भुवीने 87 सामन्यांमध्ये 90 फलंदाजांना आऊट केलं आहे. तिसऱ्या स्थानी यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने 70 सामन्यांमध्ये 89 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या स्थानी अनुक्रमे अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्या विराजमान आहेत. दोघांच्या नावावर प्रत्येकी 87 विकेट्स आहेत. मात्र अर्शदीपने हार्दिकच्या तुलनेत निम्म्या सामन्यात या विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिकने 105 तर अर्शदीपने 56 सामन्यांमध्ये 87 विकेट्स मिळवल्या आहेत.
त्यामुळे आता अर्शदीप आणि हार्दिक या दोघांपैकी या मालिकेत युझवेंद्र चहल याचा महारेकॉर्ड उद्धवस्त करत नंबर 1 भारतीय गोलंदाज होण्याचा बहुमान मिळवणार का? याकडे साऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.
T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.