IND vs SL, 2nd Test, LIVE Streaming: जाणून घ्या कधी, कुठे पाहता येईल डे-नाईट कसोटी सामना?

मोहालीतील पहिल्या कसोटीत एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताने पाचवे स्थान निश्चित केले आहे, त्यानंतर आता टीम इंडिया बंगळुरूमधील विजयासह गुणतालिकेत पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.

IND vs SL, 2nd Test, LIVE Streaming: जाणून घ्या कधी, कुठे पाहता येईल डे-नाईट कसोटी सामना?
Rohit Sharma
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 10:49 AM

बंगळूरु : बंगळुरुतल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chennamma Stadium) आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या दिवस रात्र कसोटी (Day Night Test) सामन्यात 100 टक्के क्षमतेनं प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. विराट कोहलीने (Virat kohli) त्याचं अखेरचं (कारकीर्दीतील 70 वं) शतक डे-नाईट कसोटीतच झळकावलं होतं. तसेच बंगळुरुचं एम. चिन्नास्वामी मैदान म्हणजे विराटसाठी दुसरं होम ग्राऊंडच आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये याच मैदानात खेळवलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताने एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात विराटनं 136 धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर 28 डावांमध्ये विराट कसोटी शतक झळकावू शकलेला नाही. यापैकी 6 डावांमध्ये कोहलीनं 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. जानेवारीत केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उभारलेली 79 धावांची खेळी ही त्याची सर्वाधिक धावांची खेळी ठरली. विराटनं मोहालीमध्ये सामन्यात 45 धावा काढल्या होत्या. आता श्रीलंकेसमोर विराटला त्याच्या 71व्या शतकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगलं वातावरण आहे.

मोहालीतील पहिल्या कसोटीत एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताने पाचवे स्थान निश्चित केले आहे, त्यानंतर आता टीम इंडिया बंगळुरूमधील विजयासह गुणतालिकेत पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्माचा हा 400 वा सामना असेल, तर कोहलीची नजर त्याच्या 71 व्या शतकावर असेल.

बंगळुरु… विराटचं दुसरं होम ग्राऊंड

गेल्या 14 वर्षांपासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोहलीने या मैदानावर अनेक आयपीएल सामने खेळले आहेत, मात्र टीम इंडियासाठी तो केवळ 3 कसोटी सामने खेळला आहे. आणि त्यात त्याचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. कोहलीने या मैदानावर केवळ 4 डाव खेळले असून त्याची 60 पेक्षा जास्त सरासरीने 181 धावा केल्या आहेत. या मैदानावर कोहलीने कसोटीत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. चिन्नास्वामी येथे त्याने पहिल्याच कसोटी डावात शतक झळकावलं होतं. टीम इंडियात नव्याने ओळख झालेल्या कोहलीने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 103 धावांची इनिंग खेळली होती. कोहलीच्या कारकिर्दीतील हे केवळ दुसरे आणि भारतातील पहिले शतक ठरले. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 51 धावा केल्या.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळवला जाईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 12 मार्च (शनिवार) रोजी खेळवला जाणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठे खेळवला जाईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी सुरू होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना दुपारी 02:00 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक दुपारी 1:30 वाजता होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह टेलीकास्ट) कुठे पाहता येईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

सबस्क्रिप्शनसह हॉटस्टारवर सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

इतर बातम्या

IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर

IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत

IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.