IND vs SL, 1st Test, Day 3, Score: भारताने कसोटी सामना जिंकला, मालिकेत 1-0 आघाडी

| Updated on: Mar 06, 2022 | 4:32 PM

IND vs SL, 1st Test, Day 3, LIVE Score: मोहालीमध्ये भारत आणि श्रीलंकेत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. भारताने आपला पहिला डाव आठ बाद 574 धावांवर घोषित केला.

IND vs SL, 1st Test, Day 3, Score: भारताने कसोटी सामना जिंकला, मालिकेत 1-0 आघाडी
रवींद्र जाडेजाची गोलंदाजीत कमाल Image Credit source: BCCI

मोहाली: टी-20 सीरीज प्रमाणे कसोटी मालिकेवरही (Test Series) भारताचं वर्चस्व कायम आहे. मोहालीतील पहिल्या कसोटी सामन्याचा (Mohali Test) अवघ्या तीन दिवसात निकाल लागला. भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला रवींद्र जाडेजा. (Ravindra jadeja) रवींद् जाडेजाच्या ऑलराऊंडर खेळाच्या बळावर भारताने या विजयाची नोंद केली. रवींद्र जाडेजाच्या नाबाद 175 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने आपला पहिला डाव आठ बाद 574 धावांवर घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोशिएशच्या हळूहळू फिरकीला अनुकूल होत जाणाऱ्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. आज कसोटीच्या तिसऱ्यादिवशी कालच्या चार बाद 108 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर श्रीलंकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 174 धावात ऑलआऊट झाला. श्रीलंकेच्या उर्वरित सहा फलंदाजांनी फक्त 66 धावांची भर घातली.

Key Events

भारताने कसोटी सामना जिंकला

भारताने श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला आहे. भारताकडे मालिकेत 1-0 अशी आघाडी आहे.

रवींद्र जाडेजाच्या नाबाद 175 धावा

भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने पहिल्याडावात नाबाद 175 धावा केल्या. सातव्या क्रमांकावर खेळताना कुठल्याही भारतीय फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 06 Mar 2022 04:11 PM (IST)

    भारताने कसोटी सामना जिंकला, मालिकेत 1-0 आघाडी

    श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेचा दुसरा डाव 178 धावात आटोपला.

  • 06 Mar 2022 03:51 PM (IST)

    भारत विजयापासून एक विकेट दूर

    भारताने श्रीलंकेला नववा धक्का दिला आहे. विश्वा फर्नांडोला भोपळाही फोडू न देता मोहम्मद शमीने पायचीत पकडलं. श्रीलंकेची अवस्था नऊ बाद 170 आहे.

  • 06 Mar 2022 03:31 PM (IST)

    श्रीलंकेला आठवा धक्का

    भारताने श्रीलंकेला आठवा धक्का दिला आहे. लासिथ एमबुलडेनियाला 2 धावांवर जाडेजाने ऋषभ पंतकरवी झेलबाद केले.

  • 06 Mar 2022 02:56 PM (IST)

    श्रीलंकेचा संघ पराभवाच्या छायेत

    श्रीलंकेचा संघ पराभवाच्या छायेत आहे. त्याच्या सातबाद 130 धावा झाल्या आहेत. भारताने श्रीलंकेवर फॉलोऑन लादला आहे. अजूनही ते 270 धावांनी पिछाडीवर आहेत.

  • 06 Mar 2022 02:23 PM (IST)

    श्रीलंकेचा डाव अडचणीत

    भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आहे. श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावांवर आटोपला. श्रीलंकेच्या चार बाद 120 धावा झाल्या आहेत. मॅथ्यूज 27 आणि चरिथ असलंका 20 धावांवर खेळतोय.

  • 06 Mar 2022 02:01 PM (IST)

    मॅथ्यूज-डिसिलिव्हाने सावरला डाव

    मॅथ्यूज आणि डिसिलिव्हाने श्रीलंकेचा डाव सावरला आहे. श्रीलंकेच्या तीन बाद 92 धावा झाल्या आहेत. मॅथ्यूज 21 आणि डिसिलिव्हा 28 धावांवर खेळतोय.

  • 06 Mar 2022 01:02 PM (IST)

    श्रीलंकेला तिसरा झटका

    वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कर्णधार दिमुथ करुणारत्नेला आऊट केलं आहे. करुणारत्नेला विकेटकीपर पंतकरवी झेलबाद केले. करुणारत्ने 27 धावांवर आऊट झाला. श्रीलंकेच्या तीन बाद 59 धावा झाल्या आहेत.

  • 06 Mar 2022 12:28 PM (IST)

    श्रीलंकेला दुसरा धक्का

    लंचनंतर खेळाला सुरुवात झाली आहे. भारताने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला आहे. पाथुम निसांकाला 6 धावांवर अश्विनने पंतकरवी झेलबाद केलं.

  • 06 Mar 2022 11:56 AM (IST)

    एमआयटी महाविद्यालयात थोड्याच मोदी होणार दाखल

    एमआयटी महाविद्यालयात थोड्याच मोदी होणार दाखल

    एमआयटी महाविद्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त

    मोठ्या संख्येने गर्दी

    पुण्यातले अनेक विद्यार्थीसोबत

    भाजपाचे अनेक नेते सुध्दा दाखल

  • 06 Mar 2022 11:49 AM (IST)

    लंच ब्रेक

    तिसऱ्या दिवसात पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. लंचपर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्याडावात एक विकेट गमावून 10 धावा झाल्या आहेत. अजूनही श्रीलंकेचा संघ 390 धावांनी पिछाडीवर आहे. दिमुथ करुणारत्ने आणि पाथुम निसांकाची जोडी मैदानात आहे.

  • 06 Mar 2022 11:24 AM (IST)

    भारताने श्रीलंकेला दिला फॉलोऑन

    श्रीलंका भारतापेक्षा अजून 400 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने फॉलोऑन दिला आहे. श्रीलंकेचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत. डावाने सामना जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

  • 06 Mar 2022 11:10 AM (IST)

    सबुकछ रवींद्र जाडेजा, श्रीलंकेचा डाव 174 धावात आटोपला

    आज सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. कालच्या चार बाद 108 वरुन पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर श्रीलंकेचा डाव 174 धावात आटोपला. रवींद्र जाडेजाने भारताकडून सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. सबकुछ रवींद्र जाडेजा असंच म्हणाव लागेल. कारण पहिल्या डावात त्याने नाबाद 175 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा संघ तब्बल 400 धावांनी पिछाडीवर आहे.

  • 06 Mar 2022 10:57 AM (IST)

    रवींद्र जाडेजाने श्रीलंकेला दिले झटके

    श्रीलंकेचा डाव गडगडला आहे. आधी जसप्रीत बुमराह त्यानंतर रवींद्र जाडेजाने श्रीलंकन संघाला हादरे दिले आहेत. डीकवेला आणि लकमलला जाडेजाने आऊट केलं. श्रीलंकेची अवस्था सात बाद 173 झाली आहे.

  • 06 Mar 2022 10:32 AM (IST)

    श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत, जसप्रीत बुमराहने दिला झटका

    भारताने श्रीलंकेला पाचवा धक्का दिला आहे. 29 धावांवर खेळणाऱ्या चरिथ असलंकाला जसप्रीत बुमराहने पायचीत पकडलं. श्रीलंकेच्या पाचबाद 161 धावा झाल्या आहेत.

  • 06 Mar 2022 10:29 AM (IST)

    निसांका-असलंकाची दमदार फलंदाजी

    पाथुम निसांका आणि चरिथ असलंका चांगली फलंदाजी करत आहेत. श्रीलंकेच्या चारबाद 161 धावा झाल्या आहेत. निसांकाने अर्धशतक झळकावलं आहे. असालंका 29 धावांवर खेळतोय.

  • 06 Mar 2022 09:34 AM (IST)

    श्रीलंकेच्या डावाला सुरुवात

    श्रीलंकेच्या डावाला सुरुवात झाली आहे. पाथुन निसांका (26) आणि चरिथ असलंका (2) ही जोडी मैदानात आहे.

  • 06 Mar 2022 09:28 AM (IST)

    अश्विन कपिल देवचा विक्रम मोडणार

    रविचंद्रन अश्विन भारताचा महान गोलंदाज कपिल देव यांचा रेकॉर्ड तोडण्याच्या नजीक आहे. कपिलने कसोटीत सर्वाधिक 434 विकेट घेतल्या होत्या. अश्विनने आतापर्यंत 432 विकेट घेतल्या आहेत. आज तिसऱ्यादिवशी अश्विन कपिल देव यांचा विक्रम मोडू शकतो.

Published On - Mar 06,2022 9:26 AM

Follow us
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.