IND vs SL : भारत श्रीलंका वनडे मालिकेपूर्वी आणखी एक धक्का, दोन स्टार गोलंदाज गेले बाहेर
टी20 मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने मात दिल्यानंतर भारतीय संघ आता वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. वनडे मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. रोहित शर्माकडे वनडे संघाचं नेतृत्व आहे. श्रीलंका मालिकेतून कमबॅकसाठी प्रयत्नशील आहे. असं असताना या मालिकेपूर्वी दोन स्टार गोलंदाज बाहेर गेले आहेत. नेमकं काय कारण ते जाणून घ्या
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होत आहे. टी20 मालिका गमावल्यानंतर श्रीलंका संघावर वनडे मालिकेत कमबॅकचं दडपण असणार आहे. असं असताना श्रीलंकन संघाला या मालिकेपूर्वीच धक्का बसला आहे. वनडे मालिका सुरु होण्यापूर्वी श्रीलंकेचे दोन स्टार गोलंदाज बाहेर पडले आहेत. मतिशा पथिराना आणि दिलशान मधुशंका दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. टी20 मालिकेपूर्वीही श्रीलंकन संघाचे तीन स्टार गोलंदाज मुकले होते. आता पुन्हा तीच स्थिती ओढावली असताना श्रीलंकन क्रीडाप्रेमी धास्तावले आहेत. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने एक्स खात्यावर याबाबतची माहिती दिली आहे. ‘सराव करताना दिलशान मधुशंकाच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे वनडे मालिकेत खेळणार नाही. तर मतिशा पथिराना याला तिसऱ्या टी20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला वनडे मालिकेसाठी मुकावं लागलं आहे.’, असं ट्वीट श्रीलंका क्रिकेट बोर्डाने केलं आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या दोन स्टार गोलंदाजांची जागा भरून काढली आहे. संघात मोहम्मद शिराज आणि इशान मलिंगाची निवड केली आहे. तसेच मालिकेदरम्यान दुखापतीचं ग्रहण लागलं तर तीन खेळाडू स्टँडबाय ठेवले आहे. यात कुसल जनिथ, प्रमोद मधुशन आणि जेफ्री वांडर्से या खेळाडूंचा समावेश आहे. वनडे मालिकेत भारताकडून दिग्गज खेळाडू मैदानात असणार आहेत. टी20 वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या मालिकेत भारताचं पारडं जड आहे. या मालिकेपासून भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दिशेने प्रवास सुरु होईल. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर या नव्या पर्वाला या मालिकेतून सुरुवात होणार आहे.
🚨 Matheesha Pathirana and Dilshan Madushanka will not take part in the ODI series as the players have sustained injuries. 🚨
Dilshan Madushanka suffered a left hamstring injury (Grade 2), the player sustained during fielding at practices. Pathirana has suffered a mild sprain on… pic.twitter.com/t5hqtTPdKC
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 1, 2024
एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ: चारित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षाना, अकिला धनंजया, इशान मलिंगा, मोहम्मद शिराज, असिथा फर्नांडो.
स्टँडबाय : कुसल परेरा, प्रमोद मदुशन, जेफ्री वँडरसे.
भारत एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेट कीपर), ऋषभ पंत (विकेट कीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, यल्दीम, सर मोहम्मद वाशी, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.