टी20 मालिकेपूर्वी श्रीलंकन खेळाडूकडून महेंद्रसिंह धोनीचं कौतुक, म्हणाला…
भारतीय संघ तीन टी20 आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियासोबत गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाचा कस लागणार आहे. गौतम गंभीरचा टीम इंडियासोबत हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे हा सामना सर्वार्थाने महत्त्वाचा आहे. असं असताना श्रीलंकन संघातील खेळाडूकडून महेंद्रसिंह धोनीचं कोतुक केलं.
टीम इंडिया 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यापासून भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर असणार आहे. तर सनथ जयसूर्या श्रीलंका संघाला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना या दौऱ्याची उत्सुकता लागून आहे. दोन्ही संघ विजयासाठी रणनिती आखत आहेत. असं असताना श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याने महेंद्रसिंह धोनीचं कौतुक केलं आहे. ‘अंडर 19 नंतर मी श्रीलंकन संघात कुठेच नव्हतो. पण जेव्हा माझं चेन्नई सुपर किंग्समध्ये पदार्पण झालं आणि सर्वकाही बदललं. माझं सिलेक्शन श्रीलंकन संघात झालं. चेन्नई सुपर किंग्ससोबत खेळणं हा देवाचा आशीर्वाद मानतो. सीएसकेसोबत खेळण्यापूर्वी मला कोणच ओळखत नव्हतं. महेंद्रसिंह धोनीसोबत ड्रेसिंगरुम शेअर करणं अभिमानास्पद होतं. खासकरून श्रीलंकेतून आल्याने’, असं पथिराना याने स्पोर्टस्टारशी बोलताना सांगितलं.
टी20 मालिकेत मथिशा पथिराना टी20 मालिकेत संघाचा भाग आहे. भारतासाठी मथिशा पथिरानाचं आव्हान असणार आहे. पथिरानाने आतापर्यंत श्रीलंकेसाठी 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने 14 विकेट्स घेतल्या आहेत. यात 24 धावा देत 4 गडी बाद करणं ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्याचा इकोनॉमी रेट 8 पेक्षा जास्त असला तरी वेगवान गोलंदाजाच्या दृष्टीने ठीक आहे. डेथ ओव्हर्समध्ये खऱ्या अर्थाने वेगवान गोलंदाजांचा कस लागतो. दुसरीकडे, दुष्मंता चमिरा मालिकेतून बाद झाल्याने पथिरानाच्या खांद्यावर धुरा असणार आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
श्रीलंकेचा टी20 संघ : चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा,महिष थिक्षाणा,चमिंडू विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुनिथ वेल्लालगे, बिनुरा फर्नांडो.
भारताचा टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.