IND vs WI 3rd ODI : टीम इंडियाचा विंडिजवर 200 धावांनी विजय, वन डे सीरिज 2-1 ने जिंकली!

India Beat West indies 3rd ODI Match : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या सामन्यामध्ये इंडियाने 200 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली आहे. सांघिक कामगिरीने संघाला शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने सहज विजय मिळवला.

IND vs WI 3rd ODI : टीम इंडियाचा विंडिजवर 200 धावांनी विजय, वन डे सीरिज  2-1 ने जिंकली!
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 10:22 AM

मुंबई :  टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील तिसऱ्या (IND vs WI 3rd ODI) आणि एकदिवसीय सामन्यामध्ये कॅरेबियन संघाचा पराभव झाला आहे. (India Win ODI Series Againsta West Indies) टीम इंडियाकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शुबमन गिल 85 धावा, ईशान किशान 77 धावा आणि कर्णधार हार्दिक पंड्या नाबाद 70 धावा या तिघांनी दमदार अर्धशतके केलीत. तिघांनी केलेल्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 352 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला. लॉर्ड शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने तब्बल 200 धावांनी अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका २-१ ने खिशात घातली आहे.

सामन्याचा संपूर्ण आढावा 

टॉस जिंकत वेस्ट इंडिज संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटींगसाठी उतरलेले टीम इंडियाचे सलामीवीर शुबमन गिल आणि ईशान किशन यांनी 143 धावांची दमदार सलामी दिली. दोघांनीही सुरूवातीला सावध पवित्रा घेतला होता मात्र छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या किशन याने तोडफोड फलंदाजी करायला सुरूवात केली. किशनने 77 धावा केल्या मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. सगल तीन वन डे सामन्यांमध्ये किशनने अर्धशतक केलं आहे. ट

दुसरीरडे शुबमन गिल यानेही या सामन्यात 85 धावांची खेळी केली. अवघ्या  15 धावांनी त्याचं शतक राहून गेलं. अंतिम सामन्यामध्ये संधी मिळालेल्या रुतुराज गायकवाड अवघ्या 8 धावा करून परतला. त्यानंतर संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या यांनी कमाल फलंदाजी केली. संजूने टी-20 स्टाईल पद्धतीने बॅटींग केली 41 चेंडूत त्याने 51 धावांची खेळी केली. हार्दिक पंड्या मैदानात एक बाजू लढवत होता. मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखला जाणार्या सूर्यकुमार यादवनेही 36 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये पंड्याने हार्ड हिंटिंग केली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरूवात एकदम खराब झाली होती. युवा खेळाडू मुकेोस कुमार याने सलामीच्या दोन्ही फलंडदाजांना माघारी लावलं. कायल मेयर्स4 धावा, ब्रँडन किंग भोपळाही फोडू दिला नाही. सुरूवातचे  आणि मधल्या शिप्टमधील फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर मात्र शेपटीने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला.  ठाकूर आणि कुलदीपने तळाच्या फलंदाजांना माघारी पाठवत संघाच्या विजयावर शिक्कामोक्तब केलं.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि जयदेव उनाडकट.

विंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायल मेयर्स, ब्रँडन किंग, एलिक एथनेज, शिमरॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, केसी कार्टी, यानिक कॅरिया, अल्झारी जोसफ, जेडन सील्स आणि गुडकेश मोती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.