Ind Vs WI, Akshar Patel : धोनीसारखा षटकार मारून अक्षरनं सामना जिंकला, त्याच्या मनात काय होतं, जाणून घ्या…

श्रेयस-संजूनेही अर्धशतक झळकावलं आणि विंडीज संघाने 50 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या. शाई होपनं कारकिर्दीतील 100 वा वनडे खेळताना 115 धावा केल्या. निकोलस पूरनने 74 धावांची खेळी खेळली. अधिक जाणून घ्या...

Ind Vs WI, Akshar Patel : धोनीसारखा षटकार मारून अक्षरनं सामना जिंकला, त्याच्या मनात काय होतं, जाणून घ्या...
अक्षर पटेलImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 8:16 AM

नवी दिल्ली : काल फक्त अक्षर, अक्षर आणि अक्षर, अशीच चर्चा होतीय फॅन्सनं ट्विटरवर अक्षरचं कौतुकच कौतुक केलं. नेमकं असं झालं तरी काय, ते आधी जाणून घ्या. पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा (IND vs WI) 2 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजवर (WI) भारताचा हा सलग 12वा मालिका विजय आहे. भारताच्या विजयाचा हिरो ठरला अष्टपैलू अक्षर पटेल (Akshar Patel). त्यानं कठीण काळात भारतासाठी 64 धावांची नाबाद खेळी खेळली आणि भारताला विजय मिळवून देऊनच तो परतला. अक्षरचं हे वनडेतील पहिलं अर्धशतक आहे. याआधी त्यानं चेंडूवरही अप्रतिम कामगिरी केली होती.  9 षटकात 40 धावा देत 1 बळी घेतला होता. तो भारताकडून सर्वात किफायतशीर गोलंदाज होता. अक्षर पटेलला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. काल अक्षरचं प्रचंड चर्चा होती, फॅन्सही त्याच्यावर खुश होते. सामन्यानंतर तो नेमकं काय म्हणाला, हे जाणून घ्या…

हा व्हिडीओ पाहा

हे सुद्धा वाचा

अक्षर पटेलला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

बीसीसीआयचं ट्विट

अक्षर काय म्हणाला?

अक्षर पटले म्हणाला करी, ‘ही खेळी माझ्यासाठी खूप खास आहे. कारण, त्यामुळे संघाला मालिका जिंकण्यात मदत झाली. मी जेव्हा फलंदाजीसाठी आलो तेव्हा प्रत्येक षटकात 10-11 धावा करण्याचं लक्ष्य माझ्या मनात होतं. आम्हाला आयपीएलचा अनुभव असल्यानं आम्ही ते साध्य करू असे मला वाटले. आम्हाला शांत राहायचं होतं आणि आम्ही नेहमी धावगती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्यासाठी हे विशेष होते कारण 2017 नंतरची ही माझी पहिली एकदिवसीय मालिका आहे आणि माझ्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही येथे आले आणि त्यासोबत मालिका जिंकल्याचा आनंद आणखीनच वाढला.

बीसीसीआयचं ट्विट

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रेयस-संजूनेही अर्धशतक झळकावले आणि विंडीज संघाने 50 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या. शाई होपनं कारकिर्दीतील 100 वा वनडे खेळताना 115 धावा केल्या. निकोलस पूरनने कर्णधारपदी 74 धावांची खेळी खेळली. भारताकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक तीन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि आवेश खान विकेट घेण्यात अपयशी ठरले. आवेशचा हा डेब्यू वनडे होता आणि तो चांगलाच महागात पडला. त्याने 6 षटकात 54 धावा दिल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानं 49.4 षटकांत 8 गडी गमावून विजयाचं लक्ष्य गाठलं. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर (63), संजू सॅमसन (54) आणि शुभमन गिलने 43 धावा केल्या.

भारताने शेवटच्या 10 षटकात 100 धावा केल्या

312 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं शेवटच्या 10 षटकात 100 धावा केल्या. 2001 नंतर शेवटच्या 10 षटकांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या 2015 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध 91 होती.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....