AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर T20 मालिकेतून बाहेर

केएल राहुल आणि अक्षर पटेलच्या रूपाने टीम इंडियाचे दोन खेळाडू या मालिकेतून आधीच बाहेर होते आणि आता टीम इंडियाला तिसऱ्यांदा धक्का बसला आहे. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे.

IND vs WI: टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर T20 मालिकेतून बाहेर
तिसरा खेळाडू मालिकेतून बाहेर
| Updated on: Feb 14, 2022 | 10:17 PM
Share

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) दुखापतग्रस्त होऊन संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. एका वृत्तानुसार, सुंदरला मालिकेपूर्वी दुखापत झाली असून यापुढे तो या मालिकेचा नसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुंदर कोलकाता येथे उपस्थित असलेल्या भारतीय संघापासून वेगळा झाला आहे आणि आता तो थेट राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) जाईल, जिथे त्याच्या दुखापतीची काळजी घेत उपचार केले जातील जाईल. सुंदरने नुकतेच एकदिवसीय मालिकेतूनच संघात पुनरागमन केले होते. वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, सुंदरला हॅमस्ट्रिंगची समस्या आहे, त्यामुळे तो या मालिकेत खेळण्याची शक्यता नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, “वॉशिंग्टनला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो आज सराव करू शकला नाही. 5 दिवसांत 3 सामने खेळवले जाणार असल्याने तो संपूर्ण टी-20 मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

मागील वर्षही सुंदरचे दुखापतीत गेलं

सुदरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतूनच टीम इंडियात पुनरागमन केले. गतवर्षी इंग्लंड दौऱ्यावर दुखापत झाल्याने तो कसोटी मालिकेत खेळला नव्हता. यानंतर तो आयपीएल 2021 आणि टी-20 वर्ल्ड कपही खेळू शकला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी सुंदरची निवड करण्यात आली होती, परंतु रवाना होण्यापूर्वी त्याला कोरोना संसर्ग झाला आणि त्यामुळे तो बाहेर झाला. टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाकडे आता फक्त लेग-स्पिनर युजवेंद्र चहल हा अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. संघात रवी बिश्नोईचाही समावेश असला तरी हरप्रीत ब्रारही स्टँडबाय म्हणून संघासोबत कोलकाता येथे पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सुंदरच्या जागी याचा संघात समावेश होतो की नाही हे पाहावे लागेल.

तिसरा खेळाडू मालिकेतून बाहेर

सुंदर आता थेट बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाईल, जिथे तो त्याच्या दुखापतीवर उपचार करेल. भारताचा धाकड खेळाडू आणि अक्षर पटेल याआधीच सिरीजमधून बाहेर गेले आहेत. राहुल आणि अक्षर देखील टी-20 मालिकेचा भाग होते, परंतु दोघांनाही वेगवेगळ्या कारणांमुळे वगळण्यात आले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान राहुलला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो तिसऱ्या वनडेत खेळू शकला नाही. त्याचवेळी, अक्षर पटेलला वनडे मालिकेपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.

IPL 2022: ‘एलआयसी’चं आयपीएल कनेक्शन: कोणत्या संघात कुणाचा किती वाटा?

Valentine’s Day: ‘Will you be my…’ बायकोसाठी जसप्रीत बुमराहने केली खास पोस्ट

Glenn Maxwell: भारताचा जावई बनणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची लग्नपत्रिका तुम्ही बघितली?

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.