IND vs WI: भारताने आजच्या सामन्यात केले चार मोठे बदल, अशी आहे प्लेइंग XI

टॉस नंतर दोन्ही संघांनी आपला अंतिम अकरा खेळाडूंचा संघ जाहीर केला. मालिकेत भारताने आधीच 2-0 विजयी आघाडी घेतली आहे.

IND vs WI: भारताने आजच्या सामन्यात केले चार मोठे बदल, अशी आहे प्लेइंग XI
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 2:04 PM

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West indies) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टॉस नंतर दोन्ही संघांनी आपला अंतिम अकरा खेळाडूंचा संघ जाहीर केला. मालिकेत भारताने आधीच 2-0 विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने आजच्या सामन्यात तब्बल चार बदल केले आहेत. कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आजच्या सामन्यातही खेळत नाहीय. त्यामुळे निकोलस पूरन (Nicholas Pooran) कर्णधारपदाची जबाबदारी संभाळतोय. वेस्ट इंडिजने त्यांच्या संघात फक्त एक बदल केला आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमधली ही 21 वी वनडे सीरीज आहे. भारताने आजचा सामना जिंकला तर, तो क्लीन स्वीप मालिका विजय ठरेल. वेस्ट इंडिजवर भारताचा पहिलाच क्लीनस्वीप मालिका विजय ठरु शकतो.

याआधी टी 20 सीरीजमध्ये वेस्ट इंडिजने दोनवेळा भारतावर क्लीनस्वीप विजय मिळवला आहे. पण भारतीय संघाला वेस्ट इंडिजवर कधी असा विजय मिळवता आलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाकडे एक नवीन अध्याय लिहिण्याची संधी आहे.

भारतीय संघात चार बदल भारतीय संघाने आजच्या सामन्यात चार बदल केले आहेत. केएल राहुल दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आहे. दीपक हुड्डाला बाहेर बसवण्यात आलं आहे. त्याच्याजागी शिखर धवनचं संघात पुनरागमन झालं आहे. युजवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूरला आराम देण्यात आला आहे. त्यांच्याजागी कुलदीप यादव आणि दीपक चहरला संधी देण्यात आलीय. वेस्ट इंडिजने अकिल हुसैनच्या जागी हेडन वॉल्श ज्यूनियरची संघात निवड केली आहे.

तिसऱ्या वनडेसाठी भारताचा संघ भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वाशिंगटन सुंदर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा

तिसऱ्या वनडेसाठी वेस्ट इंडिजचा संघ वेस्ट इंडीज: शाई होप, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, डॅरेन ब्रावो, शमारा ब्रुक्स, जेसन होल्डर,हेडन वाल्श जूनियर, फॅबियन एलेन, ओडियन स्मिथ, अल्जारी जोसेफ, केमर रोच

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.