Team India : ‘मी बॉलर्सला आधीच सांगितलं होतं, की…’; शुबमन गिलने विजयानंतर सर्व काही सांगून टाकलं

Shubman Gill on ind vs zim 3rd T20 Match : टीम इंडियाने झिम्बाब्वेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 23 धावांनी विजय मिळवला आहे. युवा टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल याने झिम्बाब्वेला पराभूत केल्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

Team India : 'मी बॉलर्सला आधीच सांगितलं होतं, की...'; शुबमन गिलने विजयानंतर सर्व काही सांगून टाकलं
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 8:58 PM

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 23 धावांनी भारताने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने आजचा सामना गमावला असता तर झिम्बाब्वेने बरोबरी साधली असती. कारण टीम इंडियाचा पहिल्याच टी-20 सामन्यामध्ये यजमानांनी पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केलेला. मात्र दुसरा आणि तिसरा टी-20 सामना जिंकत टीम इंडियाने दमदार कमबॅक केलं आहे. सामना संपल्यावर कॅप्टन शुबमन गिल याने गोलंदाजांना काय सांगितलं होतं ते सांगितलं आहे.

आजच्या सामन्यात विजय मिळवल्याने चांगलं वाटत आहे. आजचा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा होता. आम्ही गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये दोन्हीमध्ये चांगली सुरूवात केली. विकेटवर काही बॉल ग्रीप घेऊन येत होते त्यामुळे ते लेंथ बॉल मारायला अवघड जात होतं. याबाबत मी आमच्या सर्व गोलंदाजांसोबत चर्चा केली. आम्हाला माहित होतं की विकेटमध्ये सुरूवातीला नव्या चेंडूने मदत मिळणार होती. पण चेंडू जुना झाला की धावा काढणं सोपं होणार होतं. संघातील प्रत्येक खेळाडू आपलं योगदान देत असल्याने हे आमच्यासाठी चांगली गोष्ट असल्याचं शुबमन गिल याने म्हटलं आहे.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 182-4 धावा  केल्या आहेत. कॅप्टन शुबमन गिल याने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. तर रुतुराज गायकवाड याने 49 धावा केल्या. झिम्बाब्वे संघाला 20 ओव्हरमध्ये 159-6 धावा करता आल्या. झिम्बाब्वेकडून मायर्सने नाबाद 65 धावा आणि क्लाइव्ह मदांडेने 37 धावांची दमदार खेळी केली पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये 23 धावांनी विजय मिळवला.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), रूतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.