IND vs AUS : एकटा ध्रुव जुरेल भिडला, पर्थ कसोटीसाठी दावा ठोकला, रोहितच्या जागी संधी मिळणार?

Dhruv Jurel India A vs Australia A : ध्रुव जुरेल याने त्याची निवड योग्य ठरवली आहे. एका बाजूला इतर खेळाडू अपयशी ठरले असताना ध्रुव जुरेल याने दुसरी बाजू लावून धरली. ध्रुवने यासह रोहितच्या जागेसाठी आपला दावा ठोकला आहे.

IND vs AUS : एकटा ध्रुव जुरेल भिडला, पर्थ कसोटीसाठी दावा ठोकला, रोहितच्या जागी संधी मिळणार?
dhruv jurel india a vs australia a
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 5:55 PM

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडिया ए ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध दुसरा अनऑफीशियल कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी टीम इंडिया ए च्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलिया ए समोर गुडघे टेकले. टीम इंडिया ए च्या फलंदाजांनी एकामागोमाग एक विकेट टाकली आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला. ऑस्ट्रेलिया ए चे गोलंदाज इंडिया ए ला धक्क्यावर धक्के देत होते. त्यामुळे भारताच्या 150 धावा होतील का? असा प्रश्न उपस्थितीत झाला. मात्र ध्रुव जुरेल याने चिवट खेळी करत बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा याच्या जागेसाठी दावा ठोकला आहे.

रोहित शर्मा याला वैयक्तिक कारणामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या 2 सामन्यात खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. अशात रोहितच्या जागी कुणाला संधी मिळणार? याची चर्चा आहे. त्यात बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या दुसऱ्या अनऑफीशियल टेस्ट मॅचच्या पूर्वसंध्येला अर्थात 6 नोव्हेंबरला इंडिया ए मध्ये ध्रुव जुरेल आणि केएल राहुल या दोघांचा समावेश केला. त्यामुळे या दोघांजवळ रोहितच्या जागी आपला दावा करण्यासाठी ही चांगली संधी होती. मात्र केएल राहुल याने ही संधी गमावली. तर ध्रुव इंडिया ए अडचणीत असताना एकटाच भिडला आणि रोहितच्या जागेसाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे निवड समिती ध्रुववर विश्वास दाखवणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

सामन्यात काय झालं?

ऑस्ट्रेलिया ए ने टॉस जिंकून टीम इंडिया ए ची दाणादाण उडवली. टीम इंडिया एच्या पहिल्या 4 पैकी दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर दोघांनी प्रत्येकी 4-4 धावा केल्या. अभिमन्यू ईश्वरन आणि साई सुदर्शन हे दोघे आले तसेच गेले. तर केएल राहुल आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाड या दोघांनी फक्त 4-4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे 4 बाद 11 अशी नाजूक स्थिती झाली. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने ठराविक अंतराने झटके दिले. मात्र ध्रुव जुरेल याने एक बाजू लावून धरली. त्यामुळे भारताला सन्मानजनक आकडा गाठता आला.

इंडिया ए कडून देवदत्त पडीक्कल याने 26, नितीश रेड्डी 16, तनुष कोटीयन 0, खलील अहमद 1 आणि प्रसिध कृष्णा याने 14 धावांची खेळी केली. तर ध्रु जुरेल याने 186 बॉलमध्ये सर्वाधिक 80 धावा केल्या. त्यामुळे 57.1 ओव्हरमध्ये 161 धावांपर्यंत पोहचता आलं. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया ए ने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 17.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 53 रन्स केल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग इलेव्हन : नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), मार्कस हॅरिस, सॅम कोन्स्टास, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, ब्यू वेबस्टर, ऑलिव्हर डेव्हिस, जिमी पीअरसन (विकेटकीपर), मायकेल नेसर, नॅथन मॅकअँड्र्यू, स्कॉट बोलँड आणि कोरी रोचिचिओली.

इंडिया अ प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, साई सुदर्शन, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, तनुष कोटियन, खलील अहमद, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.