World Cup 2023 Points Table | भारताचा पाकिस्तानला धोबीपछाड, अफगाणिस्तानला पराभूत करत गुणतालिकेत मोठी झेप
World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेचं चित्र पालटत आहे. कधी वर कधी खाली अशी उलथापालथ होत आहे. अफगाणिस्तानला पराभूत करत भारताने मोठी झेप घेतली आहे.
मुंबई : उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघाची साखळी फेरीत धडपड सुरु आहे. दहा पैकी चार संघ उपांत्य फेरीत धडक मारतील. यासाठी गुणांसह चांगल्या नेट रनरेटची आवश्यकता आहे. आतापासून नेट रनरेटची शर्यत सुरु झाली आहे. तसं पाहिलं तर एखादा संघ 9 पैकी 7 सामने जिंकला की थेट उपांत्य फेरी गाठेल. पण तसं शक्य होईल की नाही येणारा काळच ठरवेल. दरम्यान चांगल्या गुणांसह नेट रनरेट महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक विजयामुळे गुणतालिकेचं गणित बदलणार आहे यात शंका नाही. भारत अफगाणिस्तान सामना होईपर्यंत पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. पण भारताने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.
गुणतालिकेत भारताची मोठी झेप
भारताने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा संघ 2 पैकी 2 सामने जिंकत 4 गुणांसह +1.958 नेट रनरेटने आघाडीवर आहे. भारतीय संघ 2 पैकी 2 सामने जिंकत 4 गुणांसह +1.500 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा संघ 2 पैकी 2 सामने जिंकत 4 गुणांसह +0.927 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
भारताचा पुढचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यातील निकाल दोन्ही संघांची पुढची वाटचाल निश्चित करणार आहे. पाकिस्तानने आतापर्यंत दुबळ्या संघांशी सामना केला आहे. खऱ्या अर्थाने पुढची लढाई कठीण होत जाणार आहे. त्यामुळे जसजशी स्पर्धा पुढे सरकेल तसा गुणतालिकेत मोठा बदल दिसून येईल. टॉपला असलेला संघ चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी लढणार, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघाची उपांत्य फेरीत लढत होईल. तर अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना पार पडला. अफगाणिस्तानने 8 गडी गमवून 272 धावा केल्या आणि विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान 2 गडी गमवून 35 षटकात पूर्ण केलं. भारताने हा सामना 8 गडी आणि 15 षटकं राखून जिंकला. यामुळे भारताला नेट रनरेटमध्ये मोठा फायदा झाला.