IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत विराटचं अनोखं ‘अर्धशतक’, चाहत्यांसह स्वत: विराटही निराश

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी दरम्यान पहिल्या डावात भारतीय फलंदाज मिळून 100 धावाही करु शकले नाही. तर कर्णधार विराटने नको ते अर्धशतक नावे केले आहे.

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत विराटचं अनोखं 'अर्धशतक', चाहत्यांसह स्वत: विराटही निराश
विराट कोहली (भारतीय कर्णधार)
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 10:32 AM

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अजूनही हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. इंग्लंड मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तो शतक तर दूर अर्धशतकही ठोकू शकलेला नाही. दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून एका चांगल्या खेळीची सर्वांनाच अपेक्षा असताना पहिल्या डावात तो केवळ 7 धावा करुन बाद झाला आहे. त्याच्यासह संपूर्ण भारतीय संघाचा (Team India) पहिला डाव केवळ 78 धावांवर आटोपला असून याचवेळी विराटच्या नावे नको ते अर्धशतक झाले आहे.

तर हे अर्धशतक म्हणजे विराट मागील 50 आंतरराष्ट्रीय डावांत एकही शतक ठोकू शकलेला नाही. नोव्हेंबर, 2019 मध्ये बांग्लादेश विरुद्ध डे-नाइट कसोटी सामन्यात शेवटचं शतक ठोकणाऱ्या विराटच्या बॅटमधून पुन्हा शतक कधी येईल? य़ाची सर्वच भारतीय आतुरतेने वाट पाहत आहेत. पण लीड्स येथील तिसऱ्या कसोटीतही विराटच्या हाती निराशाच आल्याने त्याने 50 आंतरराष्ट्रीय डाव हे शतक न ठोकता घालवले आहेत.

शतक तर दूर, अर्धशतकही ठोकणंही अवघड

कसोटी क्रिकेटमध्ये 27 शतकांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 70 शतकं ठोकणाऱ्या कोहलीचा सध्या खराब टाईम सुरु आहे. मागील दोन वर्षात एकाही प्रकारात तो शतक ठोकू शकलेला नाही. याआधी तो सलग 25 डावांत शतक ठोकू शकला नव्हता. मात्र आता ही संख्या 50 झाली आहे. शतकच नाही तर कोहलीला अर्धशतक ठोकणंही अवघड झालं आहे. कारण 2020 पासून आतापर्यंत तो केवळ 3 कसोटी अर्धशतकं ठोकू शकला आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यात तो आतापर्यंत WTC पकडून तो 7 डाव खेळला आहे. ज्यामध्ये एकही अर्धशतक आलेले नाही. आता लीड्समधील दुसऱ्या डावाततरी तो हा दुष्काळ संपवतो का? हे पाहावे लागेल.

हे ही वाचा

IND vs ENG : भारतीय संघाच्या पाठी लागला ‘हा’ इंग्रज, तिसऱ्या कसोटीत पराभव निश्चित? ‘हे’ आहे कारण

IND vs ENG : जो रुट आणि विराट कोहलीमध्ये मैदानाबाहेरही झाला होता वाद, समोर आली खळबळजनक माहिती

(India is in danger position at third test and virat kohli did not scored century in last 50 international cricket innings)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.