WTC Final : विल्यमसनने एका झटक्यात तोडलं होतं विराटचं हृदय, कोहलीच्या जखमा अजूनही ताज्या, आता व्याजासकट परतफेड?

WTC च्या अंतिम सामन्यात भारत न्यूझीलंडची व्याजासकट परतफेड करणार का? अशी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. (India Lost ICC World Cup 2019 Semi Final WTC Final 2021)

WTC Final : विल्यमसनने एका झटक्यात तोडलं होतं विराटचं हृदय, कोहलीच्या जखमा अजूनही ताज्या, आता व्याजासकट परतफेड?
विराट कोहली आणि केन विल्यमसन
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 9:52 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यासाठी (India Tour of England) लवकरच रवाना होतोय. खास करुन विराट कोहलीला (Virat Kohli) ICC चा पहिला करंडक जिंकण्याची संधी आहे आणि त्यालाही त्याची ओढही लागलीय. विराट कोहली या अगोदर 2019 मध्ये ICC चा पहिला करंडक जिंकण्याच्या सर्वाधिक जवळ पोहोचला होता. परंतु केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने एकदिवसीय वर्ल्ड कपच्या सेमी फायनल सामन्यात भारतीय संघाला पराभूत करुन विराट कोहली आणि टीम इंडियाला मोठा झटका दिला होता. आता भारतीय कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा आयसीसी टूर्नामेंटच्या नॉक आउट सामन्यात केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाला भिडणार आहे. विराट कोहलीच्या जुन्या जखमाही यानिमित्ताने ताज्या झाल्यात. आता WTC च्या अंतिम सामन्यात भारत न्यूझीलंडची व्याजासकट परतफेड करणार का? अशी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. (India Lost ICC World Cup 2019 Semi Final WTC Final 2021)

धोनीची शेवटची मॅच

2019 चा वर्ल्डकप मध्ये शानदार प्रदर्शन करून भारतीय संघाने सेमी फायनल मध्ये जागा मिळवली होती. फक्त दोन मॅच खेळायच्या आणि आयसीसीच्या जगज्जेतेपदाच्या करंडक उंचवायचा हे स्वप्न विराट कोहलीने पाहिलं होतं. परंतु विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने सेमी फायनलच्या सामन्यात भारताचा धुव्वा उडवला. महेंद्रसिंग धोनीची क्रिकेट करियर मधली ही शेवटची मॅच ठरली. धोनी यानंतर निळ्या जर्सी मध्ये खेळलेला दिसलाच नाही शेवटी त्याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुड बाय केलं.

काय झालं होतं सेमीफायनल सामन्यात…?

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ही मॅच 9 जुलै 2019 ला मॅंचेस्टर येथे खेळली गेली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट गमावून 239 धावा केल्या. संघाचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर 90 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एका षटकारासह मदतीने 74 धावा केल्या तर केन विल्यमसनने 95 चेंडूत 67 जणांची खेळी केली. या खेळीला त्याने सहा चौकारांचा साज चढवला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 3 विकेट घेतल्या. न्यूझीलंडने केलेला स्कोर काही मोठा नव्हता. परंतु सामन्यादरम्यान थोडासा पाऊस पडून गेला आणि हाच या मधला टर्निंग पॉइंट ठरला.

भारताला या स्कोरचा पाठलाग करणं मुश्किल होऊन बसलं. भारताने आपल्या तीन विकेट्स फक्त 5 धावांवर गमावल्या. यानंतर 92 रुग्णांवर सहा विकेट गेल्या. नंतर रवींद्र जडेजा आणि एम एस धोनीने सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय संघाचा 18 रन्सने या मॅचमध्ये पराभव झाला. या सामन्यात भारताकडून जडेजाने सर्वाधिक 77 रन्स केले. 59 बॉल मध्ये त्याने चार षटकार आणि चार चौकार लगावले. याशिवाय महेंद्रसिंग धोनीने 72 बॉलमध्ये एक चौकार आणि एका षटकारासह मदतीने 50 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने भारतीच्या 3 फलंदाजांना तंबूत पाठवलं.

(India Lost ICC World Cup 2019 Semi Final WTC Final 2021)

हे ही वाचा :

Video : शिखर धवनच्या बासरीचे मधुर स्वर, ‘गब्बर’ने वाजवलेलं ‘ओठो से छू लो तुम..’ एकदा ऐकाच!

अनुष्का शर्माचा कोणता सिनेमा आवडतो?, विराट कोहलीने सांगितली ‘दिल की बात!’

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.