Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 1st T20: श्रीलंकेविरुद्ध आज असा असू शकतो संघ, इशान किशन की, संजू सॅमसन कोणाला संधी देणार?

भारत आणि श्रीलंकेमध्ये (India vs Srilanka) आजपासून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. लखनऊमध्ये पहिला सामना खेळला जाईल.

IND vs SL 1st T20: श्रीलंकेविरुद्ध आज असा असू शकतो संघ, इशान किशन की, संजू सॅमसन कोणाला संधी देणार?
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 3:50 PM

नवी दिल्ली: भारत आणि श्रीलंकेमध्ये (India vs Srilanka) आजपासून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. लखनऊमध्ये पहिला सामना खेळला जाईल. मागच्याच आठवड्यात वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) तीन वनडे आणि तीन टी-20 (T-20 Series) सामन्यात भारताने क्लीन स्वीप केलं. भारताने वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका सहज खिशात घातली. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही असाच विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पण श्रीलंकेकडून तोडीची टक्कर मिळू शकते. कारण श्रीलंका आशिया खंडातील संघ आहे. भारताप्रमाणे श्रीलंकेच्या क्रिकेटपटूनाही फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर चांगला सराव आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ नवखा भासत असला, तरी आव्हान तितकं सोपं नसेल. पण मायदेशात खेळण्याचा टीम इंडियाला नक्की फायदा होईल. रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह हे खेळाडू आजच्या सामन्याद्वारे पुनरामगन करणार आहे. संजू सॅमसनचाही टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात संजू सॅमसन की, इशान किशन रोहित कोणाला संधी देणार? त्याची उत्सुक्ता आहे. इशान किशन मागच्या काही सामन्यात अपयशी ठरला होता.

कोणा-कोणाला दिली विश्रांती?

जाडेजा दुखापतीमुळे मागचे दोन-अडीच महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. माजी कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. केएल राहुलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत विंडिज विरुद्धच्या मालिकेत उपकर्णधार होता. केएल राहुल, वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि विंडिज विरुद्धची मालिका गाजवणारा सूर्यकुमार यादव यांना दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.

रोहितला कठीण निर्णय घ्यावे लागतील

रवींद्र जाडेजाचा संघात समावेश करताना रोहित शर्माला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. जाडेजाच्या अनुपस्थितीत वेंकटेश अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर यांना ऑलराऊंडर म्हणून संधी देण्यात आली. तिघांनी चांगली कामगिरी केली. जाडेजा संघात नसताना रवी बिश्नोई आणि युजवेंद्र चहल हे दोन फिरकी गोलंदाजांना एकत्र खेळवण्यात आलं. जाडेजा संघात परतल्यानंतर टीम एकाच स्पेशलिस्ट गोलंदाजाला संघात कायम ठेवू शकते. कारण जड्डू स्वत: उत्तम फिरकी गोलंदाज आहे.

आजच्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी असा असू शकतो संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, वेंकटेश अय्यर, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल,

India Predicted XI vs Sri Lanka 1st T20 Will Ishan Kishan continue to open? Jadeja, Bumrah’s return bolster side

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.