Thangarasu Natarajan | चाळीत टेनिस बोलने यॉर्करचा सराव, ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 पदार्पण, थंगारासू नटराजनची संघर्षकथा

थंगारासूने ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 2 विकेट्स घेतल्या.

Thangarasu Natarajan | चाळीत टेनिस बोलने यॉर्करचा सराव, ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 पदार्पण, थंगारासू नटराजनची संघर्षकथा
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 4:21 PM

कॅनबेरा : एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Tour Australia 2020)यांच्यात आज 3 टी 20 मालिकेतील पहिला सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात यॉर्कर किंग थंगारासू नटराजनने (Thangarasu Natrajan T 20 Debut Agianst Australia) टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं . सामन्याच्या आधी गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नटराजनला इंडियन कॅप दिली. नटराजनने ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपलं एकदिवसीय पदार्पण केलं होतं. या पदार्पणातील एकदिवसीय सामन्यात नटराजनने 2 विकेट्स घेतल्या. फिरकीपटू वरुण चक्रवर्थी (Varun Chakravarthy) या दौऱ्याआधी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे नटराजनला टी 20 मालिकेत संधी मिळाली. नटराजनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याने इथवर येण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. एकदिवसीय आणि टी 20 पदार्पणाच्या निमित्ताने आपण थंगारासूचा इथवरचा प्रवास पाहणार आहोत. india tour australia 2020 1 st t 20 childhood spent in poverty learned yorker in dirty streets thangarasu natarajan t 20 debut

टेनिस बोलने यॉर्करचा सराव

आयपीएलच्या 13 व्या मोसमात थंगारासू यॉर्कर किंग म्हणून उदयास आला. बंगळुरुविरोधातील सामन्यात एबीडी व्हीलियर्सला यॉर्कर चेंडूवर बोल्ड केलेलं सर्व क्रिकेट चाहत्यांना चांगलंच लक्षात आहे. थंगारासू यॉर्कर चेंडू टाकायला सहजासहजी शिकला नाही. त्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. वयाच्या 20 व्या वर्षांपर्यंत थंगारासूने गली क्रिकेटमध्ये टेनिस बॉलने यॉर्कर टाकण्याचा सराव केला.

प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं अनन्य साधारण महत्व असतं. यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शकाची आवश्यकता असते. प्रशिक्षक जयप्रकाश यांच्यामुळे थंगारासूला टीएनसीएच्या चौथ्या तुकडीकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यांचे आभार मानण्यासाठी थंगारासूने आयपीएलमध्ये त्यांच्या नावाची असलेली जर्सी परिधान करुन खेळला.

घरखर्चासाठी चिकन विक्री

मार्गदर्शकाशिवाय थंगारासूला त्याच्या घरच्यांनी चांगली साथ दिली. थंगारासूला क्रिकेट खेळण्यासाठी घरून पाठिंबा होता. घरगाडा चालवण्यासाठी थंगारासूची आई रस्त्याच्या कडेला चिकन विक्री करायची. याद्वारे थंगारासूचं घरखर्च चालायचा. मात्र थंगारासू यशस्वी झाल्यानंतरही त्याची आई अजूनही चिकन विक्री करतेय. दरम्यान थंगारासू यशस्वी झाल्यानंतर आपल्या आई वडिलांसाठी नवं घर बांधलं.

कारकिर्दीच्या सुरुवातीला अडचणी

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. 2015 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटदरम्यान (First Class Cricket) थंगारासूच्या आक्षेपार्ह बोलिंग अॅक्शनमुळे बंदी घालण्यात आली. मात्र थंगारासू खचला नाही. त्याने आपल्या बोलिंग अॅक्शनमध्ये आवश्यक तो बदल केला. त्यानंतर 2016 मध्ये थंगारासूने आपल्यात असलेली चमक दाखवली. थंगारासूने तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये चमकदार गोलंदाजी केली. या स्पर्धेतील प्रदर्शनच्या जोरावर त्याच्यासाठी आयपीएलचे दरवाजे खुले झाले.

आयपीएल पदार्पण

थंगारासूनला 2017 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघात समाविष्ठ करण्यात आलं. पंजाबने थंगारासूसाठी 3 कोटी मोजले. मात्र त्याला या मोसमात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. यानंतर तब्बल 2 वर्षांच्या अंतराने म्हणजेच 2020 मध्ये त्याने आयपीएलमध्ये कमबॅक केलं. थंगारासूने आयपीएलच्या 13 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं. दुखापतीमुळे या 13 व्या मोसमात गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाला. या दुखापतीमुळे भुवनेश्वरला या मोसमाला मुकावे लागले. भुवनेश्वर हैदराबादच्या गोलंदाजीचा कणा होता. मात्र या मुख्य गोलंदाजाच्या अनुपस्थितीत थंगारासूने उल्लेखनीय आणि लक्षवेधी कामगिरी केली. थंगारासूने या मोसमातील 16 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातम्या :

India vs Australia, 3rd Odi | ‘यॉर्कर किंग’ थंगारसू नटराजनचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण

india tour australia 2020 1 st t 20 childhood spent in poverty learned yorker in dirty streets thangarasu natarajan t 20 debut

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.