Champions Trophy 2025 संदर्भात अखेर BCCI ने घेतला मोठा निर्णय
Champions Trophy 2025 : T20 वर्ल्ड कप 2024 नंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा सुरु झाली आहे. पुढच्यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धे संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
T20 वर्ल्ड कप 2024 नंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी ICC ची पुढची स्पर्धा आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानने यासाठी ICC ला वेळापत्रकाचा प्रस्ताव सुद्धा पाठवला आहे. ही टुर्नामेंट 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. पण बीसीसीआयला टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवायच नाहीय. टीम इंडियाने 2008 पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. या दरम्यान एक मोठी अपडेट आहे. 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानात जाण्याची शक्यता नाहीय. दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयकडून आयसीसीला दिला जाऊ शकतो, असे रिपोर्ट्स आहेत.
बीसीसीआयमधील सूत्रांनी एएनआयला ही माहिती दिलीय. भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध बिघडले आहेत. मागच्या काही काळापासून दोन्ही देशात चांगले संबंध नाहीयत. अंतिम निर्णय केंद्र सरकारवर अवलंबून असेल. त्यामुळेच दोन्ही देशांमध्ये एकही द्विपक्षीय सीरीज झालेली नाही. भारत-पाकिस्तान आयसीसी टुर्नामेंट आणि आशिया कपच्या निमित्तानेच आमने-सामने येतात.
हायब्रिड मॉडल म्हणजे काय?
2023 मध्ये आशिया कपच यजमानपद पाकिस्तानला मिळालं होतं. त्यावेळी सुद्धा भारतीय टीमने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता. हायब्रिड मॉडलमध्ये टुर्नामेंटच आयोजन झालं होतं. चार सामने पाकिस्तानात अन्य सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. टीम इंडिया श्रीलंकेत आपले सर्व सामने खेळली होती. फायनलही तिथेच झाली होती. बीसीसीआय यावेळी सुद्धा आयसीसीकडे हायब्रिड मॉडलचा प्रस्ताव मांडू शकते.
India unlikely to travel to Pakistan for Champions Trophy, will ask ICC to hold matches in Dubai, Sri Lanka
Read @ANI Story | https://t.co/In7UraZMPc#India #ChampionsTrophy #ICC #Pakistan #CricketTeam pic.twitter.com/GT965QJN9H
— ANI Digital (@ani_digital) July 11, 2024
ड्राफ्ट शेड्यूलनुसार भारताचे सामने पाकिस्तानात कुठे?
ड्राफ्ट शेड्यूलनुसार टीम इंडियाला आपले सर्व सामने लाहोरमध्ये खेळायचे आहेत. टीम इंडिया 20 फेब्रुवारीला बांग्लादेश विरुद्ध पहिला सामना खेळेल. दुसरा सामना 23 फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध होईल. ग्रुप स्टेजचा तिसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध 1 मार्चला होऊ शकतो.