Ind vs Aus 1st Test : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, अशी आहे टीम इंडियाची Playing 11
Ind vs Aus 1st Test :अलीकडच्या काही वर्षात बॉर्डर-गावस्कर सीरीजवर टीम इंडियाने वर्चस्व गाजवलय. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन ही ट्रॉफी जिंकली. ती सल आजही ऑस्ट्रेलियाच्या मनात कायम आहे.
Ind vs Aus 1st Test : आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. क्रिकेट विश्वातील दोन बलाढ्य संघ आमने-सामने आले आहेत. क्रिकेटप्रेमींना भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजची मोठी उत्सुक्ता आहे. कारण याआधी दोन्ही देशांमधील टेस्ट सीरीज उत्कंठावर्धक झाल्या आहेत. अलीकडच्या काही वर्षात बॉर्डर-गावस्कर सीरीजवर टीम इंडियाने वर्चस्व गाजवलय. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन ही ट्रॉफी जिंकली. ती सल आजही ऑस्ट्रेलियाच्या मनात कायम आहे. टेस्ट सीरीजमधील त्याच पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर आली आहे. दोन्ही देशांमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल.
कोणी जिंकला टॉस ?
पहिल्या कसोटीसाठी टॉस उडवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सने टॉस जिंकला. ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरच्या खेळपट्टीवर चौथ्या डावात बॅटिंग करणं खूप कठीण असतं.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,
1ST TEST. India XI: KL Rahul, R Sharma (c), C Pujara, V Kohli, S Yadav, S Bharat (wk), A Patel, R Ashwin, R Jadeja, M Shami, M Siraj. https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 9, 2023
टीम इंडियाला सीरीज का जिंकावी लागेल?
WTC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही सीरीज अत्यंत महत्त्वाची आहे. टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही सीरीज जिंकावीच लागेल. कॅप्टन म्हणून रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. भारतीय टीमने मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग तीन सीरीज जिंकल्या आहेत. यात दोन सीरीज ऑस्ट्रेलियात झाल्या होत्या. 2004 पासून ऑस्ट्रेलियाने किती टेस्ट मॅच जिंकल्यात ?
2004 पासून ऑस्ट्रेलियासाठी सीरीज जिंकण लांब राहिलं, त्यांनी फक्त एक कसोटी सामना जिंकलाय. यावेळी हाच इतिहास बदलण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. पण त्यांच्या मार्गात टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांचा आव्हान असेल. स्पिनिंग ट्रॅक टीम इंडियाच मुख्य बलस्थान आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाची ती मुख्य अडचण आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आधीच फिरकी गोलंदाजांचा धसका घेतलाय. त्यामुळेच अश्विनसारखी गोलंदाजीची शैली असलेल्या बॉलरला त्यांनी नेट्समध्ये गोलंदाजासाठी पाचारण केलं होतं.