AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IndvsAus : सूर्यकुमार यादवला पाहावी लागणार आणखी वाट? रोहितकडून ‘या’ खेळाडूचं नाव पुढे

कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये होणार आहे. या सामन्यात भारताचे स्टार खेळाडू शुबमन गिल आणि सुर्यकुमार यादवच्या खेळण्याबाबत रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे.

IndvsAus : सूर्यकुमार यादवला पाहावी लागणार आणखी वाट? रोहितकडून 'या' खेळाडूचं नाव पुढे
| Updated on: Feb 08, 2023 | 5:46 PM
Share

नागपूर :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये होणार आहे. अशातच या कसोटीमध्ये कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारतासाठी ही कसोटी मालिका महत्त्वाची आहे. कारण चार सामन्यांमधील तीन सामन्यात विजय मिळवला तरच भारताला वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये एन्ट्री मिळणार आहे. मात्र या सामन्यात भारताचे स्टार खेळाडू शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादवच्या खेळण्याबाबत रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाला रोहित? नागपूरमधील पहिल्या कसोटीमध्ये दोघांमधील गिलने आता झालेल्या वनडे आणि टी-20 सामन्यांमध्ये शतके झळकवली आहेत. मात्र सूर्या काय करू शकतो हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यामध्ये अंतिम अकरामध्ये कोणाला संधी द्यायची हे अद्याप ठरवलं नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं आहे.

नागपूरमधील पिच फिरकीपटूंसाठी अनुकूल आहे. याबाबत बोलताना, आमच्याकडे दर्जेदार फिरकीपटू असून आश्विन आणि जडेजा यांनी भरपूर एकत्र क्रिकेट खेळलं आहे. तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी ज्यावेळी संधी मिळाली तेव्हा चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्हाला फक्त आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करायचं असल्याचं रोहित म्हणाला.

शुबमन गिलने श्रीलंका आणि न्यूझीलंडसारख्या संघांविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत धुंवाधार बॅटींग केली आहे. त्यामुळे निवड समितीला त्याच्या नावासाठी विचार करायला भाग पाडलं आहे. इतकंच नाहीतर शुबमन याआधीही बॉर्डर-गावसकरमध्ये खेळला आहे. त्यावेळी त्याने चमकदार कामगिरी केली होती.

2004 पासून ऑस्ट्रेलियाने भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. दोन्ही देशांमधील कसोटी मालिका तब्बल सहा वर्षानंतर भारतीय भूमीवर खेळवली जात आहे. शेवटच्या 2017 च्या कसोटी मालिकेमध्ये भारताने चार सामन्यांच्या मालिकेमध्ये कांगारूंना 2-1 ने धूळ चारली होती.

 कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ :

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.