Australia vs India, 1st Test, Day 3 : ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा, मालिकेत 1-0 ने आघाडीवर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटीचा आजचा तिसरा दिवस आहे.

Australia vs India, 1st Test, Day 3 : ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा 8 विकेट्सने  धुव्वा, मालिकेत 1-0 ने आघाडीवर
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 4:31 PM

अ‌ॅडिलेड : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पहिल्या कसोटी सामन्यात (India Vs Australia 2020) तिसऱ्याच दिवशी 8 विकेट्सने पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कांगारुंनी टीम इंडियाला दुसऱ्या डावात झटपट धक्के दिले. त्यामुळे टीम इंडियाची 9 बाद 36 अशी स्थिती झाली. त्यामुळे 36 धावांवरच टीम इंडियाचा डाव घोषित करण्यात आला. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 धावांचे माफक आव्हान दिले होते. कांगारुंनी हे विजयी आव्हान 2 विकेट्स गमावून 21 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 93 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जो बर्न्सने नाबाद 51 धावा केल्या. तर मॅथ्यू वेडने 33 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवीचंद्रन आश्विनने एकमेव विकेट घेतली. india vs australia 2020 1st test day 3 live cricket score updates online in marathi at adelaide oval  लाईव्ह स्कोअरकार्ड

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या जोडीने 70 धावांची भागीदारी केली. यानंतर चोरटी धाव घेण्याच्या नादात मॅथ्यू वेड 33 धावांवर रन आऊट झाला. वेडनंतर मार्नस लाबुशाने मैदानात आला. मात्र लाबुशानेही 6 धावा करुन माघारी परतला. यानंतर जो बर्न्स आणि स्टीव्ह स्मिथ या जोडीने कांगारुंना विजय मिळवून दिला.

टीम इंडियाचा दुसरा डाव

टीम इंडियाने दुसऱ्या डावात लाज काढली. कांगारुंच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाला 9 विकेट्स गमावून 36 धावाच करता आल्या. मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाल्याने टीम इंडियाचा दुसरा डाव 39-9 धावांवर घोषित करण्यात आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाकडे 62 धावांची आघाडी होती. दुसऱ्या दिवसखेर मयंक अग्रवाल आणि जसप्रीत बुमराह नाबाद होते. मात्र तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. यानंतर टीम इंडियाचा दुसरा डाव पत्त्यासारखा कोसळला.

दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. कांगारुंनी एकामागोमाग एक विकेट गमावले. यामुळे टीम इंडियाची 36-9 अशी स्थिती झाली. 53 धावांच्या आघाडीच्या जोरावर टीम इंडियाने कांगारुंनाऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 धावांचे आव्हान दिले.

कांगारुंचा पहिला डाव

कांगारुंचा पहिला डाव टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 191 धावांवर गुंडळला. कांगारुंकडून कर्णधार टीम पेनने सर्वाधिक धावा केल्या. पेनने नाबाद 73 धावा केल्या. त्याने 99 चेंडूत ही खेळी केली. यामध्ये त्याने 10 चौकार लगावले. तर मार्नस लाबुशाननेही 47 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. टीम इंडियाने लाबुशानेला तब्बल 3 जीवनदान दिले. लाबुशानेला पहिला जीवनदान 4 धावांवर मिळाला. त्याने या संधीचा चांगलाच लाभ घेत 47 धावा ठोकल्या.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल केली. फिरकीपटू रवीचद्रंन आश्विनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर उमेश यादवने 3 तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाचा पहिला डाव

पहिल्या डावात टीम इंडियाने सर्वबाद 244 धावा केल्या. टीम इंडियाकडून पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 74 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने 43 तक अजिंक्य रहाणेने 42 धावांची खेळ केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर पॅट कमिन्सनेही 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. तसेच जोश हेझलवूड आणि नॅथन लायनने प्रत्येकी 1 विकेट मिळवला.

डावनिहाय माहिती

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 धावांचे आव्हान.

टीम इंडियाला दुसऱ्या डावात 53 धावांची आघाडी. टीम इंडियाच्या दुसरा डाव्यात केवळ 36 धावा.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावांवर ऑल आऊट.

पहिल्या डावात टीम इंडियाच्या सर्वबाद 244 धावा.

दरम्यान बॉर्डर-गावसकर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना मेलबर्न येथे खेळला जाणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ : टीम पेन (कर्णधार), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मोझेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशाने, नॅथन लायन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन आणि मॅथ्यू वेड.

india vs australia 2020 1st test day 3 live cricket score updates online in marathi at adelaide oval

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.