ICC T20I Batting Rankings | विराट आणि केएलची टी 20 मालिकेत शानदार कामगिरी, आयसीसी क्रमवारीत ‘या’ क्रमांकावर झेप

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर टी 20 मालिकेत 2-1 च्या फरकाने विजय मिळवला.

ICC T20I Batting Rankings | विराट आणि केएलची टी 20 मालिकेत शानदार कामगिरी, आयसीसी क्रमवारीत 'या' क्रमांकावर झेप
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 11:34 AM

सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधातील (Team India t 20 Series Against Australia) टी 20 मालिकेत 2-1 च्या फरकाने विजय मिळवला. या मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उप कर्णधार केएल राहुलने (K L Rahul) चमकदार कामगिरी केली. या कामगिरीचा त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. विराट आणि केएलला आयसीसी टी 20 बॅट्समन रॅंकिगमध्ये (ICC Men’s T20I Batting Rankings) 1 स्थानाचा फायदा झाला आहे. India vs Australia 2020 virat kohli jumps to eighth and KL Rahul jump third spot in icc T20 batting rankings

विराटने नवव्या क्रमांकावरुन आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या मालिकेआधी विराट नवव्या क्रमांकावर होता. विराटने अफगाणिस्तानच्या हजरातुल्लाह जाजईला पछाडत आठवा क्रमांक पटकावला आहे. विराट ताज्या आकडेवारीनुसार 697 गुणांसह आठव्या क्रमांकावर विराजमान आहे. विराट या टी 20 मालिकेत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने एकूण 3 सामन्यात 140 च्या स्ट्राईक रेटने आणि 44 च्या सरासरीने 134 धावा केल्या.

फिंचला पछाडत केएल तिसऱ्या क्रमांकावर

केएल राहुललाही एका क्रमाचा फायदा झाला आहे. केएलने या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचला पछाडलं. यासह केएलने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. केएलच्या नावावर एकूण 816 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. केएलने या मालिकेतील 3 सामन्यात 81 धावा केल्या.

पहिल्या क्रमांकावर इंग्लंडचा फलंदाज

या क्रमवारीत इंग्लंडच्या डेव्हिड मिलानला पहिला क्रमांक कायम राखण्यास यश आले आहे. मिलानच्या नावावर एकूण 915 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. बाबरच्या नावावर 871 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.

कसोटी मालिका

दरम्यान या टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरोधात एकूण 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेची सुरुवात 17 डिसेंबरपासून होणार आहे. हा पहिला सामना अॅडिलेडमध्ये खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Ind Vs Aus 2020 : तिसऱ्या टी-ट्वेन्टीत भारताची धीम्या गतीने बोलिंग, मॅच रेफ्रीने ठोठावला दंड

India vs Australia 2020 virat kohli jumps to eighth and KL Rahul jump third spot in icc T20 batting rankings

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.