IND vs BAN : वर्ल्ड कपआधी संघात मोठा बदल, जवळपास अर्धा संघ बदलला
Ind vs Ban : टीम मॅनेजमेंटने संघातील 5 खेळाडूंना खाली बसवत एका युवा खेळाडूला पदार्पण करण्याची संधी दिली. इतर खेळाडूंना संघात प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं आहे. पाहा कोण आहेत ते खेळाडू
मुंबई : आशिया कपमध्ये भारत आणि बांगलादेशमधील सामन्याला सुरूवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात संघात मोठे बदल केल आहेत. संघातील 5 खेळाडूंना टीम मॅनेजमेंटने खाली बसवत एका युवा खेळाडूला पदार्पण करण्याची आणि इतर खेळाडूंना संघात प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं आहे. वर्ल्ड कप आधी संघात प्रयोग केले जात आहेत.
कोण आहेत ते खेळाडू?
भारतीय संघामध्ये एकूण 5 बदल केले आहेत. त्यांच्या जागी तिललक वर्मा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी संघात कमबॅक केलं आहे. संघातून विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना आराम देण्यात आला आहे. तिलक वर्मा याने या सामन्यामधून वन डे करिअरमध्ये पदार्पण केलं आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलक वर्मा याने टी-20 मधूम कमबॅक केलं होतं. या दौऱ्यानंतर तिलक वर्मा याची आशिया कपमध्ये निवड झाली होती. आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यानेही संघात पुनरागमन केलं आहे. आजच्या सामन्यात यांच्यासह स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (W), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (C), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (W), इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा