India vs England 2021, 1st T20 | जेसन रॉय-जॉस बटलरची फटकेबाजी, इंग्लंडचा भारतावर 8 विकेट्सने शानदार विजय

| Updated on: Mar 12, 2021 | 10:36 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20 सामना लाईव्ह (india vs england 1st t20 live score)

India vs England 2021, 1st T20 | जेसन रॉय-जॉस बटलरची फटकेबाजी, इंग्लंडचा भारतावर 8 विकेट्सने शानदार विजय
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20 सामना लाईव्ह (india vs england 1st t20 live score)

अहमदाबाद : इंग्लंडने टी 20 मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडने टीम इंडियावर पहिल्या टी 20 सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने हे विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 28 तर जॉनी बेयरस्टोने नाबाद 26 धावा केल्या. टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.  (india vs england 1st t20 live score updates in marathi narendra modi stadium ahmedabad ind vs eng 2021 t20i cricket match news online) लाईव्ह स्कोअरकार्ड

Key Events

इंग्लंडची विजयी सुरुवात

इंग्लंडने या टी 20 मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडने पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियावर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला दिलेले विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली.

मुंबईकर श्रेयस अय्यरचे झुंजार अर्धशतक

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. केएल राहुल, शिखर धवन आणि विराट कोहली स्वसतात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने टीम इंडियाचा डाव सावरला. श्रेयसने फटकेबाजी करत 48 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 67 धावांची खेळी केली

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 12 Mar 2021 10:34 PM (IST)

    जोस बटलर ठरला ‘मॅन ऑफ द मॅच’

    इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा जोफ्रा आर्चरला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. जोफ्राने 4 ओव्हरमध्ये 23 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.  विशेष म्हणजे यामध्ये जोफ्राने 1 मेडन ओव्हर टाकली.

  • 12 Mar 2021 10:22 PM (IST)

    इंग्लंडची विजयी सलामी

    इंंग्लंडने टी 20 मालिकेची दणक्यात सुरुवात केली आहे. इंग्लंडने पहिल्या टी 20 सामन्यात भारतावर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले  होते. हे विजयी आव्हान इंग्लंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर जॉस बटलरने 28 धावांची खेळी केली. तर डेव्हीड मलान आणि जॉनी बेयरस्टो या दोघांनी अनुक्रमे नाबाद 24 आणि 26 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 12 Mar 2021 09:53 PM (IST)

    इंग्लंडला दुसरा धक्का

    वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडला दुसरा धक्का दिला आहे. सुंदरने जेसन रॉयला आऊट केलं आहे. रॉयने 32 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 49 धावांची खेळी केली.

  • 12 Mar 2021 09:34 PM (IST)

    इंग्लंडला पहिला धक्का

    फिरकीपटू युजवेंद्र चहलने इंग्लंडला पहिला धक्का दिला आहे. चहलने जोस बटलरला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. बटलरने 28 धावा केल्या.

  • 12 Mar 2021 09:27 PM (IST)

    इंग्लंडची शानदार सुरुवात

    विजयी आव्हानाचे पाठलाग करताना  इंग्लंडने शानदार सुरुवात केली आहे. जोस बटलर आणि जेसन रॉय या सलामी जोडीने पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये जोरदार फटेकाबाजी केली. यासह या जोडीने सलामी अर्धशतकी भागीदारी केली.

  • 12 Mar 2021 09:19 PM (IST)

    केएल राहुलची अफलातून फिल्डिंग

    केएल राहुने सीमारेषेवर अफलातून फिल्डिंग केली आहे. यासह केएलने टीम इंडियासाठी 4 धावा वाचवल्या आहेत.  अक्षर पटेल सामन्यातील पाचवी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील पहिल्या  चेंडूवर जोरदार फटका मारला. हा फटका सिक्स होता. पण केएलने हवेत झेप घेत तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकला. यामुळे इंग्लंडला केवळ 2 धावा मिळाल्या. यामसह केएलने भारतासाठी 4 धावा वाचवल्या.

  • 12 Mar 2021 09:01 PM (IST)

    इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात

    इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून  जेसन रॉय आणि जॉस बटलर ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले आहे.

  • 12 Mar 2021 08:50 PM (IST)

    इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान

    टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले आहे.  भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 124 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने 48 चेंडूत 67 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याशिवाय रिषभ पंतने 21 तर हार्दिक पांड्याने 19 धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

  • 12 Mar 2021 08:35 PM (IST)

    टीम इंडियाला सहावा धक्का

    टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. शार्दुल ठाकूर मोठा फटका मारण्याच्या नादात पहिल्याच चेंडूवर आऊट झाला.

  • 12 Mar 2021 08:30 PM (IST)

    भारताला पाचवा धक्का

    टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. हार्दिक पांड्या आऊट झाल आहे. पांड्याने 21 चेंडूत  19 धावा केल्या.

  • 12 Mar 2021 08:28 PM (IST)

    श्रेयस अय्यरचे झुंजार अर्धशतक

    श्रेयस अय्यरने झुंजार अर्धशतक झळकावलं आहे. श्रेयसने 36 चेंडूत ही कामगिरी केली आहे. श्रेयसच्या टी 20 कारकिर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं आहे.

  • 12 Mar 2021 07:51 PM (IST)

    टीम इंडियाला चौथा धक्का

    टीम इंडियाने चौथी  विकेट गमावली आहे. तडाखेदार बॅटिंग करत असलेला रिषभ पंत आऊट झाला आहे. पंत बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला आहे.

  • 12 Mar 2021 07:37 PM (IST)

    पावरप्लेमधल 6 ओव्हरमध्ये भारताच्या 22 धावा

    टीम इंडियाने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 22 धावा केल्या आहेत. दरम्यान रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर ही युवा जोडी मैदानात खेळत आहे.

  • 12 Mar 2021 07:32 PM (IST)

    टीम इंडियाला तिसरा धक्का

    टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. सलामीवीर गब्बर शिखर धवन आऊट झाला आहे. धवनच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला आहे. यामुळे टीम इंडियाची 20-3 अशी स्थिती झाली आहे. दरम्यान धवननंतर श्रेयस अय्यर मैदानात आला आहे.

  • 12 Mar 2021 07:23 PM (IST)

    पंतचा रिव्हर्स स्वीप मारत अफलातून सिक्सर

    रिषभ पंतने पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेचला आहे. पंतने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप खेचत षटकार खेचल. त्यानंतर पुढील चेंडूवर चौकार खेचला. अशा प्रकारे पंतने 2 चेंडूत 10 धावा केल्या.

  • 12 Mar 2021 07:20 PM (IST)

    रिषभ पंतचा शानदार चौकार

    रिषभ पंतने टीम इंडियाकडून पहिला चौकार लगावला आहे. सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर आदिल राशिदच्या चेंडूवर चौकार खेचला आहे.

  • 12 Mar 2021 07:16 PM (IST)

    टीम इंडियाला मोठा धक्का

    टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहली आऊट झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 3-2 अशी झाली आहे. दरम्यान विराटनंतर रिषभ पंत मैदानात आला आहे.

  • 12 Mar 2021 07:12 PM (IST)

    टीम इंडियाला पहिला धक्का

    टीम इंडियाची खराब सुरुवात झाली आहे. सलामीवीर के एल राहुल 1 धावा करुन माघारी परतला आहे. केएल बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला आहे.

  • 12 Mar 2021 07:04 PM (IST)

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. शिखर धवन आणि केएल राहुल सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 12 Mar 2021 06:47 PM (IST)

    इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

    इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हीड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि मार्क वुड.

  • 12 Mar 2021 06:42 PM (IST)

    टीम इंडियाचे अंतिम 11 शिलेदार

    विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत(यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल

  • 12 Mar 2021 06:35 PM (IST)

    इंग्लंडने टॉस जिंकला

    इंग्लंडने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.

  • 12 Mar 2021 05:35 PM (IST)

    संभावित टीम इंडिया

    विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर

  • 12 Mar 2021 05:33 PM (IST)

    दोन्ही संघ तुल्यबळ

    आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 14 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी उभयसंघांनी प्रत्येकी 7 मॅचेस जिंकल्या आहेत. यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. यामुळे या दोन्ही संघात ‘काटे की टक्कर’ असणार आहे.

  • 12 Mar 2021 05:31 PM (IST)

    टॉसचा बॉस कोण ?

    6 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात येणार आहे. त्यामुळे टॉसचा बॉस कोण ठरणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

Published On - Mar 12,2021 10:34 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.