IND vs ENG 1st Test : टीम इंडियाचा कॅप्टन रोहितसाठी वाईट बातमी, मालिकेआधीच इंग्लंडने केला मोठा गेम
IND vs ENG 1st Test Rohit sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माविरोधात इंग्लंड संघाने मोठी चाल खेळली आहे. रोहित शर्मा याची ताकद कशी कमजोरी होऊ शकते याबाबत एक इंग्लंडच्याच खेळाडूने मोठा खुलासा केला आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमधील पहिली कसोटी हैदराबाद येथील राजीव गांधी मैदानावर होणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमध्ये विराट कोहली खेळणार नाही. भारतीय मैदानांवर खेळायचं असल्याने इंग्लंड संघसुद्धा चांगली तयारी करत आहे. भारतात फिरकीपटूंना चांगली मदत मिळते त्यामुळे पाहुण्यांसाठी मोठं आव्हान असणार आहे. मात्र इंग्लंड संघाने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासाठी ट्रॅप लावला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना मार्क वुड याने याबाबत खुलासा केला आहे.
रोहितसाठी इंग्लंडची खास योजना
रोहित शर्मा शॉर्ट बॉलवर मोठे फटके खेळतो कारण ती त्याची ताकद आहे. मला माहित आहे त्याला शॉर्ट बॉल टाकल्यावर तो मागे हटणार नाही. मात्र रोहितला योग्य ठिकाणी शॉर्ट बॉल टाकूनच आऊट करता येऊ शकतं. कारण भारतातील खेळपट्ट्या संथ असल्या कारणाने शॉर्ट बॉल कमी वेगाने जातो, त्यामुळे रोहित आऊट होऊ शकतो. असं मार्क वूड याने म्हटलं आहे.
रोहित शर्माच्याविरूद्ध प्रत्येक संघाचा प्लॅन हा शॉर्ट बॉल टाकून त्याला कॅच आऊट करण्याचा असतो. कारण कित्येकवेळा रोहित त्याची ताकद असूनही त्या बॉलवर आऊट झाला आहे. रोहितची ताकद कमी पडली किंवा चेंडू कमी वेगाने बॅटच्या मध्यभागी नाही बसला तर कॅचआऊट होण्याची जास्त शक्यता आहे.
दरम्यान, इंग्लंडचा संघ पूर्ण तयारीनेच येणार आहे, इग्लंडने पाकिस्तान संघाला त्यांच्या मैदानात जात व्हाईटवॉश दिला होता. पाकिस्तान संघाला इंग्लंडने 3-0 ने लोळवलं होतं. त्यामुळे टीम इंडियालाही त्यांच्याच भूमीत हरवण्याच्या इराद्याने पाहुणा संघ उतरेल. मात्र टीम इंडियाला घरच्या मैदानावर हरवणं काही खायची गोष्ट नाही.
पहिल्या दोन कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान