India vs England 4th Test, Day 1 Highlights | पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसखेर 1 बाद 24 धावा

| Updated on: Mar 04, 2021 | 5:11 PM

टीम इंडिया 4 सामन्यांच्या (India vs england 2021) कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 10 विकेट्सने विजय मिळवला होता.

India vs England 4th Test, Day 1 Highlights  | पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसखेर 1 बाद 24 धावा
टीम इंडिया 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 10 विकेट्सने विजय मिळवला होता.

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील  (India vs England 4th Test) चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसखेर टीम इंडियाने 24 धावा करुन 1 विकेट गमावली आहे. तर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा  नाबाद आहेत. पुजारा 15 तर रोहित 8 धावांवर नॉट आऊट आहेत. तर शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाने 1 विकेट गमावली. गिल भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. त्याआधी टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 205 धावांवर गुंडाळलं.  (india vs england 2021 4th test day 1 live cricket score updates online in marathi at narendra modi cricket stadium ahmedabad) लाईव्ह स्कोअरकार्ड

Key Events

इंग्लंडच्या पहिल्या डावात 205 धावा

टीम इंडियाच्या फिरकीसमोर इंग्लंडने पुन्हा एकदा लोटांगण घातलं आहे. इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपल्या फिरकीचा जलवा दाखवला. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 3 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. तसेच मोहम्मद सिराजने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

मालिकेत टीम इंडिया आघाडीवर

या कसोटी मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला. त्यानंतरच्या पुढील 2 सामन्यात भारताने इंग्लंडवर मात केली. हा चौथा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 04 Mar 2021 05:08 PM (IST)

    पहिल्या दिवसाचा खेळ संपला

    चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने 12 ओव्हर्समध्ये 1 विकेट गमावून 24 धावा केल्या आहेत.  खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा 8  तर चेतेश्वर पुजारा 15 धावांवर नाबाद होते. त्याआधी टीम इंडियाने इंग्लंडला  205 धावांवर ऑल आऊट केलं.

    टीम इंडिया   24-1 (12 Overs)
    रोहित शर्मा – 8*
    चेतेश्वर पुजारा -15*
  • 04 Mar 2021 04:14 PM (IST)

    टीम इंडियाला पहिला धक्का

    टीम इंडियाच्या पहिल्या डावाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. शुबमन गिल शून्यावर आऊट झाला आहे.

  • 04 Mar 2021 04:05 PM (IST)

    इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला

    इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपल्या फिरकीचा जलवा दाखवला. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 3 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. तसेच मोहम्मद सिराजने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

  • 04 Mar 2021 03:46 PM (IST)

    जॅक लीचचा चौकार, इंग्लंड 200 पार

    इंग्लंडच्या 200 धावा पूर्ण झाल्या आहेत. जॅक लीचने अश्विनच्या बोलिंगवर चौकार खेचत  संघाच्या धावा  200 पार नेल्या.

  • 04 Mar 2021 03:37 PM (IST)

    टी ब्रेकनंतर इंग्लंडची घसरगुंडी

    टी ब्रेकनंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी काही ओव्हर्स सावधरित्या खेळल्या. पण त्यानंतर इंग्लंडने एकामागोमाग एक अशा ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यामुळे इंग्लंडची 121-5  वरुन थेट 189-9  अशी स्थिती झाली आहे.

  • 04 Mar 2021 02:53 PM (IST)

    इंग्लंड 150 पार

    इंग्लंडने 150 धावांचा टप्पा पार केला आहे. ओली पोप आणि डॅनियल लॉरेन्स खेळत आहेत.

  • 04 Mar 2021 02:45 PM (IST)

    तिसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात

    टी ब्रेकनंतर तिसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. ओली पोप आणि डॅनियल लॉरेन्स खेळत आहेत.  हे दोन्ही फलंदाज टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर संघर्ष करत आहेत.

  • 04 Mar 2021 02:38 PM (IST)

    दुसऱ्या सत्रातील खेळ समाप्त

    चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसामधील दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे. या दुसऱ्या सत्रात इंग्लंने  2 विकेट्स गमावून 70 धावा केल्या. इंग्लंडने टी ब्रेकपर्यंत 5 विकेट्स गमावून एकूण 144 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून या सामन्यात आतापर्यंत बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली आहे. दरम्यान ओली पोप आणि डॅनियल लॉरेन्स खेळत आहेत.

    इंग्लंडचा टी ब्रेक पर्यंत स्कोअर  : 144/5

  • 04 Mar 2021 01:49 PM (IST)

    बेन स्टोक्स आऊट, इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

    अर्धशतकी खेळीनंतर बेन स्टोक्स आऊट झाला आहे. वॉशिंग्टन सुंदरने स्टोक्सला एलबीडब्लयू आऊट केलं. स्टोक्सने 55 धावांची खेळी केली.

  • 04 Mar 2021 01:34 PM (IST)

    बेन स्टोक्सचे अर्धशतक

    बेन स्टोक्सने चौकारासह झुंजार अर्धशतक पूर्ण केलं आहे. स्टोक्सच्या या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे.  ओली पोप आणि बेन स्टोक्स मैदानात खेळत आहेत.

  • 04 Mar 2021 01:13 PM (IST)

    ओली पोपचा चौकार, इंग्लंड 100 पार

    इंग्लंडने  100 धावांचा टप्पा ओलांडला आहे. इंग्लंडने 4 विकेट्स गमावून 100 धावा पूर्ण केल्या आहेत. ओली पोपने खेचलेल्या चोकारासह इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण झाल्या.

  • 04 Mar 2021 01:09 PM (IST)

    भारतीय गोलंदाज इंग्लंडवर वरचढ

    टीम इंडियाचे गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांवर वरचढ ठरत आहेत. गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडला बांधून ठेवलं आहे. इंग्लंडने 100 धावांच्या आत आपल्या टॉप 4 फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या आहेत.

  • 04 Mar 2021 12:34 PM (IST)

    इंग्लंडला चौथा धक्का

    मोहम्मद सिराजने जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स ही सेट जोडी फोडली आहे. सिराजने बेयरस्टोला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. बेयरस्टोच्या रुपात इंग्लंडला चौथा धक्का बसला आहे. बेयरस्टोने 28 धावांची खेळी केली.

  • 04 Mar 2021 12:20 PM (IST)

    दुसऱ्या सत्राला सुरुवात

    लंचब्रेकनंतर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स ही जोडी मैदानात खेळत आहेत. इंग्लंडने पहिल्या सत्रात 3 विके्टस गमावून 74 धावा केल्या.

  • 04 Mar 2021 12:05 PM (IST)

    पहिल्या सत्रावर टीम इंडियाचं वर्चस्व

    पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रातील खेळ संपला आहे. इंग्लंडने या पहिल्या सत्रात इंग्लंडने 3 विकेट्स गमावून 74 धावा केल्या आहेत.

    लंचब्रेकपर्यंत इंग्लंडचा स्कोअर

    इंग्लंड = 74-3 (25 Ov)

    जॉनी बेयरस्टो – 28*
    बेन स्टोक्स – 24*
  • 04 Mar 2021 11:02 AM (IST)

    इंग्लंडच्या 50 धावा पूर्ण

    इंग्लंडच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत.  इंग्लंडने 3 विकेट्स गमावून 50 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

  • 04 Mar 2021 10:40 AM (IST)

    इंग्लंडला मोठा धक्का

    इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. रुटने 5 धावा केल्या. इंग्लंडची आता 30-3 अशी स्थिती झाली आहे.

  • 04 Mar 2021 10:18 AM (IST)

    इंग्लंडला दुसरा झटका

    अक्षर पटेलने  इंग्लंडला दुसरा दणका दिला आहे. अक्षरने सलामीवीर झॅक क्रॉलीला  मोहम्मद सिराजच्या हाती कॅच आऊट केलं आहे. झॅकने 9 धावा केल्या.

  • 04 Mar 2021 10:02 AM (IST)

    इंग्लंडला पहिला धक्का

    इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. अक्षर पटेलने आपल्या स्पेलमधील पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर सिबलेला क्लिन बोल्ड केलं. सिबले बाद झाल्यानंतर जॉनी बेयरस्टो मैदानात आला आहे.

  • 04 Mar 2021 09:35 AM (IST)

    इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात

    इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून झॅक क्रॉली आणि डॉमिनिक सिबले ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 04 Mar 2021 09:16 AM (IST)

    इंग्लंड प्लेइंग इलेवन

    इंग्लंड प्लेइंग इलेवन : डॉम सिब्ले, जॅक क्रॉले, जॉनी बेयरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, डी लॉरेन्स, बेन फोक्स, डॉमनिक बेस, जॅक लीच, आणि जेम्स अँडरसन.

  • 04 Mar 2021 09:10 AM (IST)

    बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी

    रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार) , अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर) , आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा.

  • 04 Mar 2021 09:05 AM (IST)

    इंग्लंडने टॉस जिंकला

    नाणेफेकीचा कौल इंगलंडच्या बाजून लागला आहे.  इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यामुळे टीम इंडिया बोलिगं करणार आहे.

  • 04 Mar 2021 08:57 AM (IST)

    टीम इंडिया सज्ज

    चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज आहे. या सामन्याआधी हेड कोच रवी शास्त्री खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे.  या सामन्यासाठी रणनिती ठरवतानाचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विट केला आहे.

  • 04 Mar 2021 08:50 AM (IST)

    टीम इंडियासाठी महत्वाचा सामना

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा चौथा कसोटी सामना महत्वाचा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा किंवा अनिर्णित राखावा लागणार आहे. या सामन्याच्या निकालावर भारताचे अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे टीम इंडियाकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

  • 04 Mar 2021 08:48 AM (IST)

    आजपासून चौथा कसोटी सामना

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून (4 मार्च)  चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होणार आहे.

Published On - Mar 04,2021 5:08 PM

Follow us
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.