IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेआधी जोस बटलरकडून खास व्यक्तीला विंटेज वाइनच स्पेशल गिफ्ट, किंमत 70 हजार

IND vs ENG 2nd ODI: कॅप्टन जोस बटलरच्या (Jos buttler) नेतृत्वाखाली इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला 100 धावांनी हरवलं. लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर दुसरा सामना खेळला गेला.

IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेआधी जोस बटलरकडून खास व्यक्तीला विंटेज वाइनच स्पेशल गिफ्ट, किंमत 70 हजार
ind vs eng Image Credit source: AP
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 1:47 PM

मुंबई: कॅप्टन जोस बटलरच्या (Jos buttler) नेतृत्वाखाली इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला 100 धावांनी हरवलं. लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर दुसरा सामना खेळला गेला. या सामन्याआधी बटलरने एका खास व्यक्तीला वाइनच्या दोन महागड्या बॉटल्स गिफ्ट केल्या. भारताविरुद्ध दुसरा वनडे सामना सुरु होण्याआधी बटलरने इंग्लंडचा माजी कर्णधार ईऑन मॉर्गनचा (eoin morgan) खास सन्मान केला. बटलरने भेट म्हणून मॉर्गनला दोन वाइटनच्या बॉटल्स दिल्या. त्याची किंमत जवळपास 70 हजार रुपये आहे. मॉर्गनने निवृत्ती स्वीकारल्यानंतर मागच्या महिन्यात जोस बटलरला इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 संघाचं कॅप्टन बनवण्यात आलं. 14 जुलै 2019 रोजी लॉर्ड्सच्या याच ऐतिहासिक मैदानावर ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने वर्ल्ड कप जिंकला होता. 3 वर्षानंतर याच दिवशी इंग्लंडने या मैदानात भारतावर मोठा विजय मिळवला.

गिफ्ट मध्ये दिली विंटेज वाइन

“ईऑन मॉर्गन प्रेरणादायी कॅप्टन आहे. मी त्याच्याकडून बरच काही शिकलो आहे. देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं, ही सन्मानाची बाब आहे” असं बटलर सामना सुरु होण्याआधी म्हणाला. मॉर्गनने अलीकडेच नेदरलँड विरुद्ध वनडे सीरीज जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. बटलरने मॉर्गनला विंटेज 2016 opus one वाइन गिफ्ट केली. लॉर्ड्स मध्ये कालचा सामना इंग्लंडने 100 धावांनी जिंकला.

बटलरची बॅट नाही चालली

इंग्लंडने सामना जिंकला असला, तरी कालच्या सामन्यात बटलर विशेष चमक दाखवू शकला नाही. त्याने फक्त 4 धावा केल्या. बटलर मोहम्मद शमीच्या चेंडूवर बोल्ड झाला. पहिल्या वनडे मध्ये त्याने 30 धावा केल्या होत्या. भारताविरुद्ध टी 20 सीरीजच्या तीन सामन्यांमध्येही त्याची बॅट चालली नव्हती. तीन सामन्यात त्याने फक्त 22 धावा केल्या होत्या. पहिल्या वनडे मध्ये भारताने इंग्लंडला 10 विकेटने हरवलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये इंग्लंडने जबरदस्त पलटवार केला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश संघाला 246 धावांवर रोखलं होतं. पण भारतीय फलंदाज याचा फायदा उचलू शकले नाहीत. संपूर्ण संघ 146 धावांवर ऑलआऊट झाला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.