IND vs ENG 2nd ODI Result: दुसऱ्या वनडेत इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव

IND vs ENG 2nd ODI Result: भारत आणि इंग्लंड़ (IND vs ENG) मध्ये काल दुसरा एकदिवसीय सामना झाला. लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला.

IND vs ENG 2nd ODI Result: दुसऱ्या वनडेत इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव
ind vs eng 2nd odiImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 7:23 AM

मुंबई: भारत आणि इंग्लंड़ (IND vs ENG) मध्ये काल दुसरा एकदिवसीय सामना झाला. लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताचा 100 धावांनी दारुण पराभव केला. रीस टॉपली इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने भारताचं कंबरड मोडलं. पहिल्या वनडेत भारतासाठी जसप्रीत बुमराहने जशी कामगिरी केली होती, दुसऱ्या वनडेत रीस टॉपलीने (Reece Topley) इंग्लंडसाठी ते करुन दाखवलं. त्याने 9.5 षटकात 24 धावा देत 6 विकेट घेतल्या. यात दोन 2 निर्धाव षटकं होती. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने आधी 1-0 अशी आघाडी घेतली होती. इंग्लंडने आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे. रविवारी होणारा तिसरा एकदिवसीय सामना निर्णायक ठरेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव 49 षटकात 246 धावांवर आटोपला.

रीस टॉपलीचं वनडे मध्ये इंग्लंडकडून सर्वोत्तम प्रदर्शन

वनडे क्रिकेट मध्ये तुलनेने सोप्या असलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 38.5 षटकात 146 धावात आटोपला. आता 17 जुलैला होणारा सामना जो संघ जिंकेल, तो वनडे मालिकेत बाजी मारेल. रीस टॉपलीने काल भेदक गोलंदाजीचा मारा केला. कालच्या सामन्यातील रीस टॉपलीचं प्रदर्शन हे वनडे क्रिकेट मध्ये इंग्लंडकडून कुठल्याही गोलंदाजाने केलेली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. रीस टॉपलीची सामनावीर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली नाही

247 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली नाही. भारताने धीम्यागतीने धावा केल्या व विकेट्सही गमावल्या. कॅप्टन रोहित शर्माला 10 चेंडू खेळल्यानंतरही खातं उघडता आलं नाही. तिसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर रीस टॉपलीने त्याला पॅव्हेलियन मध्ये पाठवलं. शिखर धवन रीस टॉपलीचा दुसरा बळी ठरला. नवव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर तो आऊट झाला. धवन आऊट झाला, तेव्हा संघाची धावसंख्या दोन बाद 27 होती. ऋषभ पंतही आल्यापावली माघारी परतला. पंत शुन्यावर आऊट झाला.

जोस बटलरने पुन्हा एकदा टॉप्लीकडे चेंडू सोपवला

विराट कोहलीचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम होता. 25 चेंडूत 16 धावा करुन त्याने तंबुची वाट धरली. डेविड विलीने त्याची विकेट काढली. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी संघाची धावसंख्या 50 पार पोहोचवली. दोघांची जोडी जमली होती. त्यावेळी कॅप्टन जोस बटलरने पुन्हा एकदा टॉप्लीकडे चेंडू सोपवला. धाव फलकावर भारताच्या 73 धावा असताना त्याने सूर्यकुमारला बोल्ड केलं. त्याने 29 चेंडूत 27 धावा केल्या. खेळपट्टीवर पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हार्दिक पंड्याला मोइन अलीने लियाम लिव्हिंगस्टोनकरवी बाद केलं. त्याने 44 चेंडूत 29 धावा केल्या.

जाडेजा-शमीकडून थोडाफार प्रतिकार

रवींद्र जाडेजाने 29 आणि मोहम्मद शमीने 23 धावा करुन थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघे बाद होताच भारताचा डाव 146 धावात आटोपला. इंग्लंडकडून रीस टॉपलीने सर्वाधिक 6, डेविड विली, ब्रायडन कार्स, मोइन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

चहलची कमाल

तत्पूर्वी भारताचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची टीम प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 246 धावांवर ऑलआऊट झाली. इंग्लंडकडून मोइन अलीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 64 चेंडूत 47 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकार आहेत. भारताकडून युजवेंद्र चहल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने इंग्लंडला हादरे दिले. 10 षटकात 47 धावा देत त्याने चार विकेट घेतले. जॉनी बेयरस्टो (38), ज्यो रुट (11) आणि बेन स्टोक्स (21) हे महत्त्वाचे विकेट चहलने घेतले. मोइन अलीने खेळपट्टीवर पाय रोवले होते. त्यावेळी चहलनेच त्याला जाडेजाकरवी झेलबाद केलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.