IND Vs ENG | दुसऱ्या कसोटीतून कुणाची दांडी गुल? अशी असेल टीम इंडियाची Playing 11!

Team India Playing 11 Against England For 2nd Test Match | रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नाहीत. त्यामुळे त्या दोघांच्या जागेवर कुणाला खेळवायचं हा सर्वात मोठा प्रश्न टीम मॅनेजमेंट समोर आहे.

IND Vs ENG | दुसऱ्या कसोटीतून कुणाची दांडी गुल? अशी असेल टीम इंडियाची Playing 11!
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 9:07 PM

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने एक दिवसआधी प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. बशीर अहमद हा डेब्यू करणार आहे. तर जेम्स एंडरसन प्लेईंग ईलेव्हनमध्ये परतला आहे. तर जॅक लीच आणि मार्क वूड हे दोघे बाहेर पडले आहेत. आता टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन कशी असणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

2 जागांसाठी चौघांमध्ये रस्सीखेच

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल या दोघांनी पहिल्या कसोटीत उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र हे दोघे दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाहीत. त्यामुळे या दोघांच्या जागी कोण? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. राहुलच्या जागेसाठी सरफराज खान आणि रजत पाटीदार या दोघांमध्ये रस्सीखेच आहे. तर जडेजाच्या जागेसाठी वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार या दोघांमध्ये चुरस आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियानेही इंग्लंडप्रमाणे 4 स्पिनर किंवा 1 अतिरिक्त फलंदाज आणि 1 पेसरसह खेळायला हवं, असं अनेक क्रिकेट विश्लेषकांचं मत आहे. असं झाल्यास, उपकर्णधार जसप्रीत बुमराह याचं खेळणं निश्चित आहे. मात्र मग मोहम्मद सिराज याला बलिदान द्यावं लागेल. आता टीम मॅनेजमेंट सिराजला बाहेर बसवते की 2 पेसरसह खेळण्याचा निर्णय घेते,याकडेही लक्ष असेल.

सरफराज खान टेस्ट डेब्यू करण्यासाठी सज्ज!

टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर),रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स एंडरसन.

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सरफराज खान/रजत पाटीदार, श्रेयस अय्यर,केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव/वाशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.