AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 3Rd T20I | कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह शानदार कामगिरी

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (india vs england 3rd t20i) विराट कोहलीने (virat kohli) नाबाद 77 धावांची खेळी केली.

India vs England 3Rd T20I | कॅप्टन कोहलीचा 'विराट' कारनामा, अर्धशतकी खेळीसह शानदार कामगिरी
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (india vs england 3rd t20i) विराट कोहलीने (virat kohli) नाबाद 77 धावांची खेळी केली.
| Updated on: Mar 16, 2021 | 11:46 PM
Share

अहमदाबाद : इंग्लंडने टीम इंडियावर तिसऱ्या टी 20 सामन्यात (India vs England 3Rd T20I) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला . जोस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने 18.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. जोस बटलरने (Jos Buttler) 52 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. तर जॉनी बेयरस्टोने 40 धावांची नाबाद खेळी करत बटलरला चांगली साथ दिली. दरम्यान त्याआधी टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक 77 धावांची नाबाद खेळी केली. यासह विराटने अनेक विक्रम आपल्या नावे केले. (india vs england 3rd t20i virat kohli makes many record)

कर्णधार म्हणून ‘या’ विक्रमाची बरोबरी

विराटचं हे अर्धशतक कर्णधार म्हणून 11 वं अर्धशतक ठरलं. यासह विराटने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनची बरोबरी केली. केनच्या नावेही कर्णधार म्हणून 11 अर्धशतकांची नोंद आहे. याबाबतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच 10 अर्धशतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टी 20 वर्ल्ड कप 2016 नंतर केला कारनामा

कोहलीचं हे सलग दुसरं अर्धशतक ठरलं. विराटने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात सलग अर्धशतक फटकावलं. विराटने दुसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी केली. विराटने टी 20 सीरिजमध्ये 5 वर्षांनंतर सलग 2 सामन्यात 2अर्धशतक लगाव्याची कामगिरी केली. विराटने याआधी टी 20 वर्ल्ड कप 2016 मध्ये ही कामगिरी केली होती. विराटने तेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 82 तर सेमी फायनलमध्ये वेस्टइंडीज विरुद्ध 89 धावांची खेळी केली होती.

112 वे आंतरराष्ट्रीय अर्धशतक

विराटचं हे अर्धशतक त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 112 वं अर्धशतक ठरलं. यासह विराट टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक अर्धशतकांबाबत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. याबाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड विराजमान आहेत. सचिनने 782 डावात 164 अर्धशतक झळकावले आहेत. तर द्रविडने 599 डावांमध्ये 145 अर्धशतक लगावले आहेत. तर विराटने टेस्टमध्ये 25, वनडेत 43 तर टी 20 मध्ये 27 अर्धशतकं लगावले आहेत.

इंग्लंड विरोधातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या

विराट या अर्धशतकी खेळीसह टी 20 मध्ये इंग्लंड विरुद्ध मोठी खेळी करणारा तिसरा भारतीय ठरला. याआधी टीम इंडियाकडून टी 20 मध्ये इंग्लंड विरुद्ध लोकेश राहुलने नाबाद 101 तर रोहित शर्माने 100 धावांची खेळी केली होती.

संबंधित बातम्या :

India vs England 3rd T20I | केएल राहुलची निराशाजनक कामगिरी, मालिकेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद

India vs England 2021, 3rd T20 | जोस बटलरची शानदार खेळी, इंग्लंडची टीम इंडियावर 8 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 ने आघाडी

(india vs england 3rd t20i virat kohli makes many record)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.