Motera Stadium | जगातील सर्वात मोठं स्टेडियम मोटेरा, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने भिडणार, वाचा का आहे खास
गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम याच मैदानावर (Motera Stadium) घेतला होता.
अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series 2021) यांच्यातील तिसरा कसोटी सामना 24 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर अर्थात अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) करण्यात आले आहे. हा सामना डे नाईट असणार आहे. विशेषे म्हणजे या मॅचमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. या स्टेडियमचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने आपण या स्टेडियमचे नक्की वैशिष्ट्य काय आहेत, जगातील सर्वात मोठे म्हणावणाऱ्या या स्टेडियममध्ये इतर स्टेडियमच्या तुलनेत काय वेगळं आहे, हे आपण पाहणार आहोत. (india vs england 3rd test Features of biggest Motera Stadium largest stadium in the world)
मोटेराची ठळक वैशिष्ट्य
साधारणपणे कोणत्याही स्टेडियममध्ये 2 ड्रेसिंग असतात. पण मोटेरामध्ये तब्बल 4 ड्रेसिंग रुम आहेत. प्रत्येक ड्रेसिंग रुममध्ये सुसज्ज जीमची सोय आहे. या स्टेडियमध्ये एकूण 55 क्लबहाऊस आहेत. त्यात 3 प्रॅक्टीससाठीची मैदानं आणि 50 खोल्यांचा समावेश आहे.
ऑलिम्पिकसाठी बनवतात तसा स्विमींग पूलसुद्धा या स्टेडियममध्ये आहे. इनडोअर क्रिकेट अकादमी, बॅडमिंटन, टेनिस कोर्ट, टेबल-टेनिस एरीना, स्क्वॅश एरीना, 3D प्रोजेक्टर असलेलं थिएटरही या स्टेडियममध्ये आहे. या स्टेडियममध्ये फ्लड लाइटऐवजी LED लाइट्स वापरलेत. यामुळे कशाचीच सावली दिसत नाही. अनेकदा खेळाडूंना सामन्यादरम्यान सावलीमुळे अडथळा निर्माण होता.
प्रेक्षकांना सामन्याचा पूर्णपणे लाभ उचलता यावा यासाठी, स्टेडियमध्ये कुठेही पिलर उभारलेला नाही. ते हलकं आणि भूकंपरोधकसुद्धा आहे. स्टेडियमच्या ग्राऊंडवरची ड्रेनेज व्यवस्था ही जगातली सर्वात आधुनिक आहे. कितीही मोठा पाऊस पडो, पाऊस थांबला की अर्ध्या तासात मॅच खेळवता येणार आहे.
मोटेरा स्टेडियमच्या मैदानात 4-6 नव्हे तर तब्बल 11 खेळपट्ट्या आहेत. लाल, काळी आणि दोन्ही प्रकारची माती अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या या खेळपट्ट्या आहेत. यातल्या काही वेगवान तर काही फिरकी गोलंदाजांस मदतशीर आहेत. स्पर्धेची, मॅचची गरज बघून खेळपट्टी निवडता येणार आहेत.
मैदानावर झालेले रेकॉर्ड
- लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी कसोटीतील 10 हजार धावांचा टप्पा याच मोटेरावर 1987 पार केला होता.
- टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी 1983 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध एका डावात 9 विकेट घेण्याचा पराक्रम केला. तसेच त्यांनी रिचर्ड हॅडलीचा 431 बळींचा विक्रमसुद्धा याच मोटेरा स्टेडियममध्ये मोडला.
- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कसोटीतील पहिले द्विशतक आणि वन डेतल्या 18 हजार धावासुद्धा इथेच पूर्ण केल्या. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्ध यांच्यात या मैदानात 2008 मध्ये कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघ 76 धावांवर ऑल आऊट झाला होता.
बांधकामासाठी एकूण 800 कोटींचा खर्च
हे स्टेडियम पूर्णपणे तोडून बांधकामासाठी एकूण 5 वर्षांचा कालावधी लागला. हा स्टेडियम 2015 ला पूर्णपणे पाडण्यात आला. त्यानंतर या स्टेडियमच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. गेल्यावर्षी फेब्रुवारी 2020 मध्ये स्टेडियमचं बांधकाम पूर्ण झालं.
या मोटेराचं स्टेडियमचं बांधकामासाठी देशातील अनेक नामचीन कंपन्यांनी टेंडर भरले होते. यामध्ये लार्सन अँड टुब्रो (677 कोटी ), शापूरजी पलूनजी (847 कोटी) आणि नागार्जुना कन्स्ट्रक्शन्स (1065 कोटी) यांचा समावेश होता. अखेर हे लार्सन अँड टुब्रोला मिळालं. लार्सन टुब्रोने 5 वर्षात सुसज्ज आणि क्रिकेटच्या दृष्टीने परिपू्ण स्टेडियमम बांधलं. या स्टेडियमच्या बांधकामासाठी एकूण 800 इतका खर्च आला.
मैदानाची प्रेक्षक संख्या
हे स्टेडियम साबरमती नदीच्या किनाऱ्यावर एकूण 63 एकरावर बांधण्यात आलं आहे. या स्टेडियमची प्रेक्षक संख्या ही तब्बल 1 लाख 10 हजार इतकी आहे. प्रेक्षक संख्येच्या बाबतीत मोटेराने ऑस्ट्रेलियाच्या एमसीजी अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला पछाडलं आहे. एमसीची प्रेक्षक संख्या ही 1 लाख इतकी आहे.
जगातील सर्वात मोठे 5 स्टेडियम भारतातच
मोटेरा स्टेडियम हे सर्वच बाबतीत मोठे ठरलं आहे. दरम्यान जगभरात क्रिकेटमधील सर्वात मोठे 5 स्टेडियम हे भारतातच आहेत. यामध्ये मोटेरा (1 लाख 10 हजार), इडन गार्डन, कोलकाता (80 हजार), ग्वाल्हेर (60 हजार) या स्टेडियमचा समावेश आहे.
स्टेडियम आणि मेट्रो स्टेशनला जोडलेले प्रवेशद्वार
या आधी या जुन्या स्टेडियममध्ये एकच प्रवेश मार्ग होता. तर नव्या स्टेडियमला तीन प्रवेश मार्ग आहेत. एक प्रवेशद्वार तर 16 स्कायवॉकद्वारे थेट मेट्रो स्टेशनला जोडलेले आहे. यामुळे प्रेक्षकांना थेट मेट्रो स्टेशनवरुन स्कॉयवॉकद्वारे येता येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होणार नाही.
या आधुनिक स्टेडियममध्ये एकूण 76 कॉर्पोरेट बॉक्स आहेत. एका बॉक्सची क्षमता ही 25 इतकी आहे. म्हणजेच एका वेळेस एका बॉक्समध्ये 25 जण ऐशोरामात बसून सामन्यांचा थरार अनुभवू शकणार आहेत.
सुसज्ज आणि आधुनिक पार्किंग व्यवस्था
या स्टेडियममची अफाट अशी पार्किंग क्षमता आहे. एकाच वेळेस या स्टेडियममध्ये 3 हजार चारचाकी आणि 10 हजार दुचाकी पार्क करता येणार आहे. तसेच या स्टेडिमवर एकाचवेळी तब्बल 60 हजार लोकं ये जा करतील इतका मोठा रँपही आहे.
संबंधित बातम्या :
India vs England 3rd Test | मोटेराची पीच फिरकीसाठी अनुकूल, टीम इंडियाचे फिरकीपटू गुलाबी चेंडूने इंग्लंडला नाचवणार
IPL लिलावात कोणत्याच टीमने विकत घेतले नाही, ‘त्या’ खेळाडूने एकहाती फिरवला सामना
(india vs england 3rd test Features of biggest Motera Stadium largest stadium in the world)