India vs England, Day 4, Highlights: रुट-बेयरस्टोमुळे इंग्लंड मजबूत स्थितीत, विजयासाठी 119 धावांची आवश्यकता
IND vs ENG 5th Test Match Live Updates: भारताकडे आता 257 धावांची आघाडी आहे. आज मोठी आघाडी मिळवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरेल.
IND vs ENG Test: ज्यो रुट आणि जॉनी बेयरस्टोने आज जबरदस्त फलंदाजी केली. दोघेही खेळपट्टीवर टिकून आहेत. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 150 धावांची भागीदारी केली. त्यामुळे चौथ्या दिवस अखेर इंग्लंडच्या तीन बाद 259 धावा झाल्या आहेत. उद्या कसोटीचा शेवटचा दिवस आहे. इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची आवश्यकता आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 378 धावांच टार्गेट दिलं आहे. इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात कली होती. त्यांनी बिनबाद 100 धावांची भागीदारी केली होती. झॅक क्रॉली आणि एलॅक्स लीस या दोन्ही सलामीवीरांना कसं रोखायचं? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता. अखेर कॅप्टन जसप्रीत बुमराहने या प्रश्नाचं उत्तर दिलं. जसप्रीत बुमराहने क्रॉलीला 46 धावांवर क्लीन बोल्ड केलं. त्यानंर आलेल्या ओली पोपला भोपळाही फोडू दिला नाही. त्याला विकेटकीपर ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. एलेक्स लीस 56 धावांवर रनआऊट झाला. या व्यतिरिक्त भारताला विकेट मिळाल्या नाहीत.
भारतीय गोलंदाजांनी आज दीशाहीन गोलंदाजी केली. त्यामुळे त्यांचं काम अधिक सोपं झालं. त्या तुलनेत इंग्लिश गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे भारतीय फलंदाज कालच्या धावसंख्येत फक्त 120 धावांची भर घालू शकले. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांनी सकाळच्या सत्रात भेदक मारा केला. कॅप्टन बेन स्टोक्सने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली व सर्वाधिक चार विकेट काढल्या.
LIVE Cricket Score & Updates
-
रुट-बेयरस्टोमुळे इंग्लंड मजबूत स्थितीत
ज्यो रुट आणि जॉनी बेयरस्टोने आज जबरदस्त फलंदाजी केली. दोघेही खेळपट्टीवर टिकून आहेत. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 150 धावांची भागीदारी केली. त्यामुळे चौथ्या दिवस अखेर इंग्लंडच्या तीन बाद 259 धावा झाल्या आहेत. उद्या कसोटीचा शेवटचा दिवस आहे. इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची आवश्यकता आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 378 धावांच टार्गेट दिलं आहे.
-
रुट-बेयरस्टोला कसं आऊट करायचं?
ज्यो रुट आणि जॉनी बेयरस्टोने भारताची चिंता वाढवली आहे. दोघांना बाद करणं भारतीय गोलंदाजांना जमत नाहीय. इंग्लंडच्या तीन बाद 222 धावा झाल्या आहेत. रुट 66 आणि बेयरस्टो 47 धावांवर खेळतोय. इंग्लंडला विजयासाठी 155 धावांची आवश्यकता आहे.
-
-
रुटची हाफ सेंच्युरी
इंग्लंडच्या 200 धावा पूर्ण झाल्या असून ज्यो रुटने 71 चेंडूत अर्धशतक झळकावलं. रुटने 7 चौकार लगावले.
-
भारताला विकेटची गरज, रुट-बेअरस्टो जोडी जमली
शतकी भागीदारीनंतर भारताला तीन विकेट झटपट मिळाले. पण आता ज्यो रुट आणि जॉनी बेयरस्टोची जोडी जमली आहे. रुट (43) आणि बेअरस्टो (22) धावांवर नाबाद आहे. 40 षटकात इंग्लंडच्या 174/3 धावा झाल्या आहेत. रुटने 7 आणि बेअरस्टोने 3 चौकार मारले आहेत.
-
इंग्लंडची तिसरी विकेट, ओपनर लीस Runout
इंग्लंडची तिसरी विकेट गेली आहे. सलामीवीर एलेक्स लीस रवींद्र जाडेजाच्या षटकात रनआऊट झाला. त्याने 56 धावा केल्या. इंग्लंडच्या तीन बाद 114 धावा झाल्या आहेत.
-
-
कॅप्टन बुमराह Action मोड मध्ये
चहापानानंतर पहिल्याच षटकात कॅप्टन जसप्रीत बुमराहने इंग्लंडला दुसरा झटका दिला आहे. ओली पोप शुन्यावर आऊट झाला. पंतकरवी झेलबाद केलं. इंग्लंडच्या दोन बाद 108 धावा झाल्या आहेत.
-
भारताला पहिलं यश
भारताला पहिलं यश मिळालं आहे. ओपनर झॅक क्रॉली OUT झाला. जसप्रीत बुमराहने त्याला 46 धावांवर बोल्ड केलं. इंग्लंडच्या एक बाद 107 धावा झाल्या आहेत.
-
इंग्लंडच्या ओपनर्सनची जबरदस्त फलंदाजी
इंग्लंडच्या ओपनर्सनची जबरदस्त फलंदाजी सुरु आहे. लीस आणि क्रॉलीने 100 धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. लीस (54) आणि क्रॉली (45) धावांवर खेळतोय.
-
एलेक्स लीसच अर्धशतक
इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना रोखणं भारतीय गोलंदाजांना जमलेलं नाही. त्यांनी 16.1 षटकात बिनबाद 76 धावा केल्या आहेत. एलेक्स लीसने अर्धशतक झळकावलं आहे. यात 8 चौकार आहेत. झॅक क्रॉली 26 धावांवर खेळतोय.
-
भारतीय गोलंदाजांचा संघर्ष
15 षटकात इंग्लंडच्या बिनबाद 70 धावा झाल्या आहेत. इंग्लंडला आता विजयासाठी 308 धावांची गरज आहे. भारतीय गोलंदाज संघर्ष करत आहेत.
-
भारतीय गोलंदाजांचा संघर्ष
एलेक्स लीस आणि झॅक क्रॉली या इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली आहे. 9 षटकात इंग्लंडच्या बिनबाद 53 धावा झाल्या आहेत. लीस (31) आणि क्रॉली (21) धावांवर खेळतोय.
-
इंग्लंडच्या दुसऱ्याडावाला सुरुवात
पाच षटकात इंग्लंडच्या बिनबाद 21 धावा झाल्या आहेत. एलेक्स लीस आणि झॅक क्रॉली ही इंग्लंडची जोडी मैदानात आहे. भारताने विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य दिले आहे.
-
भारताचा डाव आटोपला
जसप्रीत बुमराह बाद झाला असून भारताचा दुसरा डाव 245 धावांवर आटोपला. पहिल्या डावातील 132 धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 377 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. दुसऱ्याडावात भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानंतर ऋषभ पंतने दुसऱ्याडावातही 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.
-
भारताला आठवा झटका
मोहम्मद शमीच्या रुपाने भारताला आठवा झटका बसला आहे. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्याने ली कडे झेल दिला. शमीने 13 धावा केल्या. भारताच्या आठ बाद 230 धावा झाल्या आहेत. भारताकडे 362 धावांची आघाडी आहे.
-
लंचला खेळ थांबला
लंचला खेळ थांबला असून भारताच्या 73 षटकात 7 बाद 229 धावा झाल्या आहेत. शार्दुल ठाकूर 4 धावांवर आऊट झाला. आज सकाळच्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांना चार विकेट मिळाल्या. भारताकडे एकूण 361 धावांची आघाडी आहे.
-
भारताला मोठा झटका, ऋषभ पंत OUT
दमदार फलंदाजी करणारा ऋषभ पंत आऊट झाला आहे. त्याने 86 चेंडूत 57 धावा केल्या. जॅक लीचच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना त्याने रुटकडे झेल दिला. भारताची स्थिती 198/6 अशी आहेत. ऋषभने 8 चौकार लगावले.
-
श्रेयस अय्यर आऊट
मॅथ्य पॉट्सच्या गोलंदाजीवर पुलचा फटका खेळताना श्रेयस अय्यर आऊट झाला. त्याने सोप झेल दिला. अय्यरने 26 चेंडूत 19 धावा केल्या. भारताच्या पाच बाद 190 धावा झाल्या आहेत.
-
ऋषभ पंतचा धमाका, दुसऱ्याडावातही हाफ सेंच्युरी
पहिल्या इनिंग प्रमाणे दुसऱ्याडावातही ऋषभ पंत जबरदस्त खेळतोय. त्याने शानदार अर्धशतक झळकावलं. 77 चेंडूत त्याने 52 धावा केल्या आहेत. यात 7 चौकार आहेत. भारताच्या चार बाद 184 धावा झाल्या आहेत.
-
भारताकडे 300 पेक्षा जास्त धावांची आघाडी
भारताकडे 300 पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे. ऋषभ पंत (46) आणि श्रेयस अय्यर (14) धावांवर खेळतोय. भारताची 174/4 अशी स्थिती आहे.
-
भारताला चौथा झटका, चेतेश्वर पुजारा OUT
चेतेश्वर पुजाराच्या रुपाने भारताची आजच्या दिवसातली पहिली विकेट गेली आहे. चेतेश्वर पुजाराला स्टुअर्ट ब्रॉडने 66 धावांवर लीसकरवी झेलबाद केलं. भारताची धावसंख्या 154/4 अशी आहे. भारताकडे आता 286 धावांची आघाडी आहे. ऋषभ पंतची साथ द्यायला श्रेयस अय्यर मैदानात आलाय,
-
जेम्स अँडरसनला दोन चौकार
आजच्या दिवसातील दुसरं षटक टाकणाऱ्या जेम्स अँडरसनला दोन चौकार लगावले. भारताच्या 48 षटकात तीन बाद 139 धावा झाल्या आहेत. भारताकडे आता 271 धावांची आघाडी आहे.
-
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. जेम्स अँडरसनने आजच्या दिवसातली पहिली ओव्हर टाकली. भारताच्या तीन बाद 126 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा (51) आणि ऋषभ पंत (30) धावांवर खेळतोय.
Published On - Jul 04,2022 3:04 PM