IND vs ENG: रोहित बद्दल राहुल द्रविड यांच्याकडून महत्त्वाची अपडेट, आता म्हणतात…
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचं (Rohit sharma) एजबॅस्टन कसोटीत खेळणं (Test Match) अजून निश्चित नाहीय. काल मीडिया रिपोर्ट्स मध्ये रोहित शर्मा खेळणार नसल्याचं म्हटलं होंत.
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचं (Rohit sharma) एजबॅस्टन कसोटीत खेळणं (Test Match) अजून निश्चित नाहीय. काल मीडिया रिपोर्ट्स मध्ये रोहित शर्मा खेळणार नसल्याचं म्हटलं होंत. पण त्यानंतर हेड कोच राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत रोहित शर्माच्या खेळण्याची शक्यता नाकारलेली नाही. रोहित शर्मा या कसोटीत खेळणार नाही, असं म्हणता येणार नाही. रोहित शर्माच्या अजून दोन चाचण्या बाकी आहेत. या चाचण्यांच्या रिपोर्ट्सवर तो खेळणार की, नाही ते स्पष्ट होईल, असं द्रविड म्हणाले. इंग्लंड विरुद्ध उद्यापासून कसोटी सामना सुरु होणार आहे. या दरम्यान रोहितच्या दोन कोरोना चाचण्या (Corona test) होणार आहेत. रोहितची आज सुद्धा कोरोना चाचणी होईल, हे रिपोर्ट आल्यानंतर मेडीकल टीम बरोबर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असं द्रविड म्हणाले.
रोहितला कधी कोविडची बाधा झाली?
रोहित शर्मा पाचव्या कसोटीसाठी उपलब्ध नाहीय, हे जसप्रीत बुमराह आणि टीम मधील अन्य सहकाऱ्यांना अधिकृतपणे कळवण्यात आलय, असं इनसाइड स्पोर्टने वृत्त दिलं होतं. भारत या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. भारताकडे तब्बल 15 वर्षांनी इंग्लंड मध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. मागच्यावर्षी कोविडमुळे अखेरचा कसोटी सामना रद्द झाला होता. तोच कसोटी सामना 1 जुलैपासून खेळला जाणार आहे. रोहित शर्माला सराव सामन्याच्या तिसऱ्यादिवशी कोविडची बाधा झाली होती.
खेळाडू कोरोनाला गांभीर्याने कधी घेणार?
रोहित शर्माला कोरोना झाल्यामुळे मयंक अग्रवालला तातडीने इंग्लंडला रवाना करण्यात आलं. कारण रोहित शर्मा खेळला नाही, तर फक्त कॅप्टनशिपचाच नाही, सलामीच्या जागेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. रोहित शर्माला कोरोना झाल्यामुळे मयंक अग्रवालला तातडीने इंग्लंडला रवाना करण्यात आलं. कारण रोहित शर्मा खेळला नाही, तर फक्त कॅप्टनशिपचाच नाही, सलामीच्या जागेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.