India vs England 2021 | टीम इंडियाला भारतात सलग 13 वी कसोटी मालिका जिंकण्याची संधी

टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या (india vs england test series) कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. या सीरिजमधील चौथा आणि अखेरचा सामना 4 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे.

India vs England 2021 |  टीम इंडियाला भारतात सलग 13 वी कसोटी मालिका जिंकण्याची संधी
टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या (india vs england test series) कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. या सीरिजमधील चौथा आणि अखेरचा सामना 4 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 8:58 AM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england test series) यांच्यात 4 मार्चपासून कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. ही चौथी कसोटी टीम इंडियासाठी मालिका विजय आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने (world test championship) महत्वाची असणार आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पोहचण्यासाठी हा सामना जिंकावा किंवा अनिर्णित करावा लागणार आहे. या दोन्ही पैकी काहीही झाल्यास टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळेल. तसेच यासह टीम इंडियाचा भारतातील 13 वा मालिका विजय ठरेल. (india vs england test series team india have chance to 13 consecutive series win at home)

2012 मध्ये अखेरचा मालिका पराभव

इंग्लंडने टीम इंडियाला भारतातच 2012 मध्ये कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. त्यानंतर भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नाही. टीम इंडियाने भारतात 2019 मध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हा बांगलादेशचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला होता. हा भारताचा 12 वा मालिका विजय ठरला होता. टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या देशात खेळताना सलग 2 वेळा 10-10 कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.

मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणारे संघ

भारत- सलग 12 सीरीज, फेब्रुवारी 2013 ते आतापर्यंत

ऑस्ट्रेलिया- सलग 10 मालिका विजय, नोव्हेंबर 1994 ते नोव्हेंबर 2000

ऑस्ट्रेलिया- 10 कसोटी मालिका, जुलै 2004 ते नोव्हेंबर 2008

वेस्टइंडिज- 8 मालिका विजय, मार्च 1976 ते फेब्रुवारी 1996

इंग्लंड- 7 सीरीज, मे 2009 ते मे 2012

साउथ अफ्रीका- 7 सीरीज, मार्च 1998 ते नोव्हेंबर 2001

टीम इंडियाने भारतात इंग्लंड विरुद्धच्या 2012 च्या कसोटी मालिकेनंतर आतापर्यंत एकूण 37 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यापैकी 30 सामन्यांमध्ये विजय झाला आहे. तर 2 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर 5 सामने हे अनिर्णित राहिले होते. ऑस्ट्रेलियाने सलग 10 टेस्ट सारीज जिंकल्या आहेत. यात त्यांनी 27 पैकी 20 सामन्यांमध्ये विजयश्री मिळवली. तर केवळ 2 सामने गमावले.

टीम इंडियाने भारतात जिंकलेल्या कसोटी मालिका

प्रतिस्पर्धी संघ,   विजयी अंतर,  वर्ष

ऑस्ट्रेलिया, 4-0 (4),  फेब्रुवारी 2013

वेस्टइंडीज,  2-0 (2), नोव्हेंबर 2013

साउथ अफ्रिका,  3-0 (4), नोव्हेंबर 2015

न्यूझीलंड,  3-0 (3), सप्टेंबर 2016

इंग्लंड,  4-0 (5), नोव्हेंबर 2016

बांग्लादेश,  1-0 (1), फेब्रुवारी 2017

ऑस्ट्रेलिया,  2-1 (4), फेब्रुवारी 2017

श्रीलंका,  1-0 (3), नोव्हेंबर 2017

अफगानिस्तान, 1-0 (1), जून 2018

वेस्टइंडीज,  2-0 (2), ऑक्टोबर 2018

साउथ अफ्रिका,  3-0 (3), ऑक्टोबर 2019

बांगलादेश,  2-0 (2), नोव्हेंबर 2019

संबंधित बातम्या :

फिरकीपटू अश्विन चतुर गोलंदाज, लक्ष्मणने उलगडलं यशाचे रहस्य

ICC Player of the Month Award | आयसीसीकडून 3 खेळाडूंना नामांकन, इंग्लंड विरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विनही स्पर्धेत

टीम इंडियाने योग्य खेळपट्टी तयार करावी, अहमदाबाद पीचच्या वादानंतर शोएब अख्तरचा सल्ला

(india vs england test series team india have chance to 13 consecutive series win at home)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.