Ind vs Ned Match Highlights | टीम इंडियाचा नेदरलँड्सवर 160 धावांनी विजय

| Updated on: Nov 12, 2023 | 9:42 PM

Ind vs Ned ICC World Cup 2023 Highlights in Marathi : भारत आणि नेदरलँड्स यांच्यात वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरीतील अखेरचा सामना पार पडला. टीम इंडियाने नेदरलँड्सवर मात करत विजयी बॉम्ब फोडला आहे.

Ind vs Ned Match Highlights | टीम इंडियाचा नेदरलँड्सवर 160 धावांनी विजय

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज 12 नोव्हेंबर रोजी साखळी फेरीतील शेवटचा सामना पार पडला. भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात हा सामना झाला. टीम इंडियाने नेदरलँड्सवर 160 धावांनी मात करत सलग नववा विजय नोंदवला.  टीम इंडियाने नेदरलँड्ससमोर 411 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर नेदरलँडस 250 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाच्या या विजयात प्रत्येकाने आपलं योगदान दिलं. आता टीम इंडिया 15 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध सेमी फायनलमध्ये भिडणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 12 Nov 2023 09:35 PM (IST)

    Ind vs Ned LIVE Score | टीम इंडियाची नेदरलँड्सवर 160 धावांची मात

    बंगळुरु | कॅप्टन रोहित शर्माने तेजा निदामनुरु याला आऊट केलं. यासह नेदरलँड्स टीम 250 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने अशाप्रकारे नेदरलँड्सवर 160 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाचा हा सलग नववा विजय ठरला.

  • 12 Nov 2023 09:09 PM (IST)

    Ind vs Ned LIVE Score | कुलदीपला दुसरी विकेट, नेदरलँड्सला सातवा झटका

    बंगळुरु | कुलदीप यादव याने लोगान व्हॅन बीक याला क्लिन बोल्ड करत नेदरलँड्सला सातवा झटका दिलाय.  कुलदीपची ही दुसरी विकेट ठरली.

  • 12 Nov 2023 08:22 PM (IST)

    Ind vs Ned LIVE Score | विराट, शुबमननंतर सूर्यकुमार यादवकडे बॉलिंगची जबाबदारी

    बंगळुरु | विराट कोहली, शुबमन गिल याच्यानंतर आता सूर्यकुमार यादव बॉलिंग टाकायला आला आहे. सूर्यकुमार यादवने नेदरलँड्सच्या डावातील 33 वी ओव्हर टाकली.

  • 12 Nov 2023 08:20 PM (IST)

    Ind vs Ned LIVE Score | जसप्रीत बुमराहचा कडक यॉर्कर, नेदरलँड्सला पाचवा धक्का

    बंगळुरु | जसप्रीत बुमराह याने परफेक्ट यॉर्कर टाकून नेदरलँड्सला पाचवा धक्का दिला. जसप्रीतने यासह पहिली विकेट घेतली.  बुमराहने बास दी लीडे याला क्लिन बोल्ड केलं.

  • 12 Nov 2023 08:10 PM (IST)

    Ind vs Ned LIVE Score | शुबमन गिलने टाकली वर्ल्ड कप 2023 मधील पहिली ओव्हर

    बंगळुरु | शुबमन गिल याने आपल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्स विरुद्ध बॉलिंग टाकली आहे. शुबमनने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या.

  • 12 Nov 2023 07:57 PM (IST)

    Ind vs Ned World Cup LIVE Score | विराटकडून नेदरलँड्सला झटका, स्कॉट एडवर्ड्स आऊट

    बंगळुरु | विराट कोहली याने वर्ल्ड कपमध्ये विकेट घेतली आहे.  विराटने नेदरलँड्सच्या स्कॉट एडवर्ड्सला आऊट केलं.

  • 12 Nov 2023 07:26 PM (IST)

    Ind vs Ned Live Score | नेदरलँड्सला तिसरा धक्का

    बंगळुरु | रवींद्र जडेजा याने पहिली शिकार करत नेदरलँड्सला तिसरा झटका दिला आहे. जडेजाने मॅक्स ओडाऊड याला क्लिन बोल्ड केलं. मॅक्स ओडाऊड याने 30 धावा केल्या.

  • 12 Nov 2023 07:19 PM (IST)

    Ind vs Ned | नेदरलँड्सला दुसरा झटका, कॉलिन अकरमन आऊट

    बंगळुरु | टीम इंडियाने नेदरलँड्सला दुसरा झटका दिला आहे. कुलदीप यादव याने कुलीन एकरमन याला आऊट केलं आहे.

  • 12 Nov 2023 06:30 PM (IST)

    India Vs Netherlands Match live score : मोहम्मद सिराजने उडवला बॉम्ब

    मोहम्मद सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये संघाला विकेट मिळवून दिली आहे. वेस्ली बॅरेसी शून्यावर माघारी परतला आहे.

  • 12 Nov 2023 06:25 PM (IST)

    Ind Vs Ned Match live score । नेदरलँड ओपनर बॅटींगसाठी मैदानात

    नेदरलंँड संघ बॅटींगसाठी मैदानात आला असून भारताच्या वेगवान गोलंदाजांपुढे त्यांचा निभाव लागतो की नाही हे पाहावं लागणार आहे. भारताकडे हुकमी एक्क्यासारखे गोलंदाज आहेत.

  • 12 Nov 2023 06:18 PM (IST)

    Ind Vs Ned Match live score : नेदरलँडला 411 चं आव्हान

    भारताने प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड संघाला 411 धावांचंं आव्हान दिलं आहे. के. एल. राहुलने नाबाद 102 धावा आणि श्रेयस अय्यरने नाबाद 128 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताने केलेली  ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याआधी 2007 साली बर्म्युडा संघाविरूद्ध भारताने 413 धावा केल्या होत्या.

  • 12 Nov 2023 05:32 PM (IST)

    Ind Vs Ned ICC World Cup live score : श्रेयस अय्यरचं विक्रमी शतक

    47व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले. वर्ल्ड कपमधील त्याचे हे पहिलेच शतक आहे. अय्यरने 84 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या यामध्ये त्याने ९ चौकार दोन षटकार मारले.

  • 12 Nov 2023 05:06 PM (IST)

    Ind Vs Ned ICC World Cup live score : श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांची शतकी भागीदारी

    श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांनी  84 बॉलमध्ये १०२ धावांची शतकी भागीदारी करत  संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला आहे. भारत आता ४२ ओव्हरमध्ये ३०४ धावांवर खेळत असून मैदानाच अय्यर आणि राहुल आहेत.

  • 12 Nov 2023 04:33 PM (IST)

    Ind Vs Ned World Cup 2023 live score : श्रेयस अय्यरचं अर्धशतक

    भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर याने अर्धशतक करत भारतीय संघाचा डाव सावरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. वर्ल्ड कपमध्ये टॉप ऑर्डरच्या सर्व खेळाडूंनी अर्धशतक करण्याची पहिलीच वेळ आहे.

  • 12 Nov 2023 04:07 PM (IST)

    Ind Vs Ned live score : किंग कोहली अर्धशतक करत आऊट

    भारताचा स्टार खेळाडू किंग कोहली अर्धशतक करत आऊट झाला आहे. कोहलीने यंदाच्या वर्ल्ड कपमधील पाचवं अर्धशतक पूर्ण केलं असून सर्वाधिक धावा करण्यच्या यादीतही कोहलीने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

  • 12 Nov 2023 03:47 PM (IST)

    Ind Vs Ned World Cup 2023 live score : भारताच्या 25 ओव्हरमध्ये 178 धावा

    सामन्यातील 25 ओव्हर संपल्या असून भारताने दोन विकेट गमावत 178 धावा केल्या आहेत. अय्यर आणि कोहली मैदानात आहेत.

  • 12 Nov 2023 03:39 PM (IST)

    दिवाळीत गावातील गटारीचे पाण्याने अंघोळ करत प्रशासनाचा निषेध

    बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने संतप्त ग्रामस्थाने गटारीच्या पाण्याने दिवाळीची अंघोळ केली. ऐन दिवाळीत गावातील गटारीचे पाण्याने अंघोळ करत प्रशासनाचा निषेध केलाय. गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने गावात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतापलेल्या गावकऱ्याने दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्यात आंघोळ केलीय.

  • 12 Nov 2023 03:18 PM (IST)

    Ind Vs Ned World Cup 2023 live score : रोहित शर्मा आऊट

    भारतीय संघाची दुसरी विकेट गेली, रोहितने 54 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्याने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केलेली. आता श्रेयस अय्यर फलंदाजीला आला आहे.

  • 12 Nov 2023 03:06 PM (IST)

    Ind Vs Ned World Cup live score : रोहितचं अर्धशतक पू्र्ण

    रोहित शर्माने या सामन्यात 44 चेंडूत चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. 14 षटक संपल्यानंतर भारतीय संघाने 1 गडी गमावून 109 धावा केल्या असून त्याच्यासोबत विराट कोहली खेळत आहे.

  • 12 Nov 2023 02:52 PM (IST)

    Ind Vs Ned Match live score : शुबमन गिल आऊट

    शुभमन गिल चांगली फलंदाजी करत होता आणि त्याने 32 चेंडूत 51 धावा केल्या, पण मीकरेनच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी झाली. तो बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रीझवर आला आहे.

  • 12 Nov 2023 02:24 PM (IST)

    रोहित- शुबमनकडून फटाके फोडायला सुरूवात, 6 ओव्हर 53-0

    रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी नेदरलँडच्या संघाला फोडायला सुरूवात केली आहे. दोघांनीही कडक फटाके फोडले असून चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळत आहे.

  • 12 Nov 2023 02:09 PM (IST)

    India Vs Netherlands live score : रोहित-गिल मैदानात

    रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानात उतरले असून चौकार-षटकारांच्या आतषबाजी पाहायला मिळेल.

  • 12 Nov 2023 01:53 PM (IST)

    Ind Vs Ned World Cup 2023 live score : दोन्ही संघांची प्लेइंग 11

    आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग 11

    भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

    नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (C/W), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

  • 12 Nov 2023 01:40 PM (IST)

    India Vs Netherlands live score : टीम इंडिया पहिल्यांदा करणार बॅटींग

    रोहितने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला असून आता भारतीय खेळाडू मैदानात फटाके खेळण्यासाठी तयार झाले आहेत.

  • 12 Nov 2023 01:18 PM (IST)

    Ind Vs Ned live score : हेड टू हेड

    वर्ल्ड कपमध्ये भारत आणि नेदरलँड आतापर्यंत दोनवेळा आमनेसामने आले आहेत. यामधील दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

  • 12 Nov 2023 12:19 PM (IST)

    Ind Vs Ned live score : नेदरलंँड संघशेवट गोड करण्यासाठी जाता-जाता करणार दुसरा उलटफेर?

    वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतील भारत आणि नेदरलँड हा शेवटचा सामना आहे. तर शेवट गोड करण्यासाठी जाता-जाता दुसरा उलटफेर करण्याचा नेदरलंँड संघ पूर्ण ताकद लावेल.

Published On - Nov 12,2023 12:14 PM

Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.