IND vs NZ, 2nd ODI, Highlights: पावसामुळे सामना रद्द
IND Vs NZ, 2nd ODI, LIVE Updates : ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं होतं.
IND vs NZ, 2nd Odi, LIVE Score: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला आहे. हॅमिल्टनमध्ये सामना सुरु झाल्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही तासांचा खेळ वाया गेला. आज फक्त 12.5 ओव्हर्सचा खेळ झाला. त्यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि शुभमन गिलची जोडी सलामीला उतरली. त्यांनी 4.5 ओव्हर्समध्ये बिनबाद 22 धावा केल्या होत्या. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये परत जावं लागलं.
न्यूजीलंडची प्लेइंग XI: फिन एलन, डेवॉन कॉनवे, केन विलियम्सन (कॅप्टन), डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मायकल ब्रेसवेल, मॅट हेनरी, टिम साऊदी, लॉकी फर्ग्यूसन
भारताची प्लेइंग XI: शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल
LIVE NEWS & UPDATES
-
IND vs NZ LIVE Score: पावसामुळे सामना रद्द
हॅमिल्टनमध्ये पाऊस थांबला नाही. त्यामुळे अंपायर्सनी अखेर मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही टीम्सच्या खेळाडूंनी परस्परांशी हस्तांदोलन केलं. टीम इंडिया या सीरीजमध्ये 1-0 ने पिछाडीवर आहे.
-
IND vs NZ LIVE Score: ओव्हर्समध्ये कपात कायम राहणार
पावसामुळे दुपारी 1 वाजेपर्यंत सामना सुरु होणार नाही. एक वाजता सामना सुरु झाला, तर 20 षटकाचा खेळ होईल.
-
-
IND vs NZ LIVE Score: पावसाचा व्यत्यय, पुन्हा खेळ थांबला
पावसाच्या व्यत्ययामुळे पुन्हा एकदा सामना थांबवण्यात आला आहे. 12.5 ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या 89/1 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादवची जोडी जमली आहे. शुभमन गिल 42 चेंडूत 45 आणि सूर्यकुमार 25 चेंडूत 34 धावांवर खेळतोय. गिलने 4 चौकार, एक षटकार मारला. सूर्यकुमारने 2 फोर, 3 सिक्स मारले.
-
IND vs NZ LIVE Score: सूर्यकुमार-गिलची जोडी मैदानात
सात ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. टीम इंडियाच्या एक बाद 34 धावा झाल्या आहेत.
-
IND vs NZ LIVE Score: टीम इंडियाला पहिला धक्का
पावसानंतर सामना सुरु झाला आहे. शिखर धवन 3 रन्सवर आऊट झाला. हेनरीने त्याला फर्ग्युसनकरवी झेलबाद केलं. शुभमन गिल 19 आणि सूर्यकुमार यादवची 1 जोडी मैदानात आहे. 6 ओव्हर अखेरीस टीम इंडियाच्या एक बाद 25 धावा झाल्या आहेत.
-
-
IND vs NZ LIVE Score: हॅमिल्टनमध्ये पाऊस थांबलाय
हॅमिल्टनमध्ये पाऊस थांबलाय. अंपायर्सकडून पीचची पाहणी करण्यात येईल. पण पाऊस पुन्हा न कोसळल्यासच ते शक्य आहे.
-
IND vs NZ LIVE Score: हॅमिल्टनमध्ये पुन्हा सुरु झाला पाऊस
पीचची पाहणी करण्याच्या 10 मिनिट आधी पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. पुन्हा एकदा पीच कव्हर्सनी झाकण्यात आला आहे. पीचची पाहणी करायला आणखी विलंब होईल.
-
IND vs NZ LIVE Score: हॅमिल्टनमध्ये पाऊस थांबला
हॅमिल्टनमध्ये पाऊस थांबला आहे. मैदान पुन्हा एकदा मॅचसाठी तयार केलं जातय. आऊटफिल्डवर पावसाचा परिणाम झालाय. मैदान खेळण्यायोग्य बनवण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.
-
IND vs NZ LIVE Score: ओव्हर्स कमी होणार
पाऊस थांबलेला नाही. अतरिक्त वेळ संपला आहे. म्हणजे सामना सुरु झाल्यास ओव्हर्स कमी होऊ शकतात. आता जितका वेळ पाऊस सुरु राहील, त्या हिशोबाने ओव्हर्स कमी होतील.
-
IND vs NZ LIVE Score: सॅमसनला बाहेर बसवल्याने चाहते नाराज
संजू सॅमसनला दुसऱ्या वनडेमध्ये संधी मिळालेली नाही. पहिल्या वनडेत त्याने चांगली कामगिरी केली होती. संजूला बाहेर बसवल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. त्यांनी टीम मॅनेजमेंटवर आपला संताप व्यक्त केलाय.
-
IND vs NZ LIVE Score: पावसाचा जोर वाढला
हॅमिल्टन येथे दुसरा वनडे सामना सुरु आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवावा लागला आहे. सध्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे लगेच सामना सुरु होण्याची शक्यता नाहीय.
-
IND vs NZ LIVE Score: शिखर धवन-शुभमन गिल मैदानात
शिखर धवन आणि शुभमन गिल ही भारताची सलामीची जोडी मैदानात आहे. 4.5 ओव्हर्समध्ये भारताच्या बिनबाद 22 धावा झाल्या आहेत. धवन 2 तर गिल 19 धावांवर नाबाद आहे. पावसामुळे सध्या सामना थांबला आहे. शुभमन गिलने 3 चौकार लगावले आहेत.
-
IND vs NZ LIVE Score: भारताची प्लेइंग XI
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आज दोन बदल करण्यात आले आहेत. शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चाहरला संधी दिली आहे. संजू सॅमसनच्या जागी दीपक हुड्डाचा समावेश करण्यात आलाय.
भारताची प्लेइंग XI: शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल
-
IND vs NZ, LIVE Score: न्यूझीलंडने टॉस जिंकला
न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलयम्सनने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Published On - Nov 27,2022 7:51 AM