IND vs NZ 3rd ODI : जिद्दीला सलाम, हार नाय मानली, पेन किलर घेऊन भारताविरुद्ध ठोकलं शतक

IND vs NZ 3rd ODI : इंदोरच्या स्टेडियमवर काल धावांचा पाऊस पहायला मिळाला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल यांच्या शतकाच्या बळावर टीम इंडियाने 385/9 धावांचा डोंगर उभारला.

IND vs NZ 3rd ODI : जिद्दीला सलाम, हार नाय मानली, पेन किलर घेऊन भारताविरुद्ध ठोकलं शतक
Devon conwayImage Credit source: GETTY IMAGES
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 7:17 AM

इंदोर – टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरीडमध्ये क्लीन स्वीप केलय. टीम इंडियाने 3-0 असा विजय मिळवला. काल इंदोरमध्ये अखेरचा वनडे सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 90 धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंदोरच्या स्टेडियमवर काल धावांचा पाऊस पहायला मिळाला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल यांच्या शतकाच्या बळावर टीम इंडियाने 385/9 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 295 धावांवर आटोपला. न्यूझीलंडच्या टीमला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचता आलं नाही. पण त्यांच्या टीमने वेगाने धावा बनवण्याचा प्रयत्न केला. या मॅचमध्ये न्यूझीलंडचा ओपनर डेवॉन कॉनवेने आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्याने भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी चांगलीच वाढवली होती.

वनडे करिअरमधील तिसर शतक

डेवॉन कॉनवेने काल वनडे करिअरमधील तिसर शतक झळकावलं. कॉनवेने 100 चेंडूत 138 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 8 षटकार होते. 24 व्या ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन सिक्स मारुन त्याने शतक पूर्ण केलं. डेवॉन कॉनवेने काल आपल्या बॅटिंगने सर्वांच मन जिंकून घेतलं. पण मैदानात उतरुन फलंदाजी करण्यासाठी त्याला पेन किलर घ्यावी लागली.

त्याचे स्नायू आखडले

शतकाच्या जवळ असताना त्याचे स्नायू आखडले. त्यामुळे तो धावा काढताना लंगडत होता. त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या संजय मांजरेकर यांनी कॉनवेने पेन किलर घेतल्याच सांगितलं.

भारताविरुद्ध वेगवान शतक

कॉनवेने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात सेंच्युरी मारली होती. आता भारतातही त्याने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केलीय. भारताविरुद्ध वेगवान शतक झळकावणारा कॉनवे न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरला. याआधी याच सीरीजमध्ये मायकल ब्रेसवेलने पहिल्या सामन्यात 57 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. कॉनवेचा एकट्याचा संघर्ष

386 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडची खराब सुरुवात झाली. न्यूझीलंडच्या इनिंगमध्ये दुसऱ्याच चेंडूवर फिल एलन आऊट झाला. न्यूझीलंडच खातही उघडलं नव्हतं. त्यानंतर कॉनवेने सूत्र आपल्या हाती घेतली. एकाबाजूने त्याने आक्रमक फलंदाजी सुरु ठेवली. हेनरी निकोल्ससोबत 106 धावांची पार्ट्नरशिप केली. डेरेल मिचेलसोबत 78 धावांची भागीदारी केली.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.