Shubhaman Gill : ‘तिला’ शुभमनसोबत डेटवर जायचं होत, पण भर मैदानात अर्शदीपने मोडलं मन, VIDEO

Shubhaman Gill : शुभमन गिलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. जस-जसा शुभमन गिलच्या धावांचा ग्राफ वरती जातोय, तसतशी त्याची फॅन फॉलोईंग वाढत चाललीय.

Shubhaman Gill : 'तिला' शुभमनसोबत डेटवर जायचं होत, पण भर मैदानात अर्शदीपने मोडलं मन, VIDEO
Shubhaman-GillImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 1:47 PM

अहमदाबाद : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फॉर्मेट कुठलाही असो, वनडे, टेस्ट किंवा T20, शुभमन गिलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. जस-जसा शुभमन गिलच्या धावांचा ग्राफ वरती जातोय, तसतशी त्याची फॅन फॉलोईंग वाढत चाललीय. गिलबद्दल तरुणीमध्ये वेगळी क्रेझ दिसून येतेय. अशीच एक महिला फॅन शुभमन गिलचा खेळ पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली. पण तिथे अर्शदीपने तिचं मन मोडलं.

गिलबद्दलच्या प्रेमाची कबुली दिली

शुभमन गिलने बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या T20 सामन्यात दमदार प्रदर्शन केलं. त्याने 63 चेंडूत 200 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 126 धावा फटकावल्या. आपल्या इनिंगमध्ये शुभमनने 12 फोर आणि 7 सिक्स मारले. त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. गिल एकाबाजूला धावांचा पाऊस पाडत होता, त्याचवेळी महिला फॅनने प्लेकार्डवरुन गिलबद्दलच्या आपल्या प्रेमाची कबुली दिली.

अर्शदीपमुळे तुटलं मन

स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या महिला फॅनच्या हातात प्लेकार्ड होता. ‘टिंडर, शुभमनशी जोडी जुळवून दे’ असा मेसेज त्यावर लिहिलेला होता. टिंडर डेटिंग APP वरुन लोक परस्परांना भेटतात. जोड्या जुळतात. मॅचनंतर शुभमन जेव्हा, प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेला, तेव्हा या महिला फॅनसह अन्य शुभमनला चीयर करत होते. टीमचे काही खेळाडू बाऊंड्री लाइनवर होते. त्यांनी मुलीच्या हातातील प्लेकार्ड वाचलं. अर्शदीपने त्यावेळी इशारा करुन हे जुळणार नाही, असं सांगितलं. अर्शदीपमुळे त्या महिला फॅनच मन मोडलं. शुभमन सारा अली खानला डेट करतोय का?

शुभमन आणि सारा खान या दोघांचा फोटो एका यूझरने शेअर केला आहे. हा फोटो एअरपोर्टवरचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. फोटोत सारा आणि शुबमन सोबत बसलेले आहेत. दोघं एकमेकांसोबत बोलतायेत. या दोघांचा फोटो व्हायरल झाल्याने नक्कीच काही तरी सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सारा आणि शुबमनचा फोटो आत्ताचा आहे की जुना, याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या दोघांमध्ये नक्कीच काही तरी गॅटमॅट सुरु असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणनं आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.