IND vs NZ 3rd Test : तिसरा आणि अंतिम सामना, टीम इंडिया सज्ज, किती वाजता सुरुवात?
India vs New Zealand 3rd Test Live Streaming : भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा सामना हा मायदेशातील अखेरचा कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे भारतासमोर हा सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे.
टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंडने ही मालिका जिंकली आहे. न्यूझीलंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे टॉम लॅथम याच्या नेतृत्वात न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाला व्हाईटवॉश करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहेत. तर टीम इंडियासमोर लाज राखण्याचं आव्हान आहे. कॅप्टन म्हणून रोहित शर्मा याच्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण भारताचा आतापर्यंत एकदाही मायदेशात 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉशने पराभव झालेला नाही.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामना शुक्रवारी 1 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 9 वाजता टॉस होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी, टीम साउथी आणि विल यंग.