IND vs SA | आफ्रिकेविरूद्ध विराट कोहलीच्या हुकमी एक्क्याचं पदार्पण, रिंकूपेक्षाही आहे कडक हिटर
SA vs IND : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील तिसऱ्या सामन्यात स्टार खेळाडूने डेब्यू केला आहे. हा स्टार खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून विराट कोहलीचा हुकमी खेळाडू आहे. कोण आहे जाणून घ्या.
मुंबई : टीम इंडिया आणि आफ्रिकेमधील तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि कुलदीप यांच्या जागी दोन नवीन खेळाडू आज मैदानात उतरले आहेत. यामधील एक खेळाडू वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर निवड कर्त्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या स्पेशल खेळाडूला संधी मिळाली आहे.
कोण आहे तो खेळाडू?
आयपीएलमध्ये आरसीबी संघाचा विराट कोहली कर्णधार असताना हा खेळाडू विराटचा तो हुकमी खेळाडू होता. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रजत पाटीदार आहे. ऋतराज गायकवाड याच्या जागी त्याला संधी मिळाली आहे. रजत पाटीदार याने 52 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3795 धावा केल्या आहेत ज्यात 11 शतकांचा समावेश आहे. RCB संघासाठी आतापर्यंत 12 सामन्यांत 404 धावा केल्या आहेत.
आजच्या सामन्यामध्ये रजत पाटादार हा साई सुदर्शन ओपनिंग करताना दिसणार आहे. साई सुदर्शन याने सलग दोन सामन्यात अर्धशतक ठोकत आपली ताकद दाखवून दिली आहे. रजत पाटादीरसाठीसुद्धा मोठी संधी आहे. आजच्या सामन्यामध्ये टीम इंडियाला विजय मिळवावाच लागणार आहे.
टीम इंडियामध्ये दोन बदल
टीम इंडियाने आज तिसऱ्या सामन्यामध्ये कुलदीपच्या जागी वॉशिंग्टन सुंदर याला संधी मिळाली आहे. तर ऋतुराज याला बोटाला दुखापत झाली असून त्याच्या जागी रजत पाटीदारला याची संघात निवड केली गेली आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.