IND vs SA 2nd Test Playing 11 | नवीन वर्षात रोहित मोठे निर्णय घेणार, जवळच्या मित्राला बाहेर बसवणार?
IND vs SA 2nd Test | टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या सुरू होणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्मा मोठा निर्णय घेणार आहे. नवीन वर्षाची विजयी सुरूवात करण्यासाठी रोहित अशी प्लेइंग 11 उतरवू शकतो.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसरा कसोटी सामना उद्या म्हणजेच बुधवारी होणार आहे. हा सामना केप टाऊन येथे पार पडणार आहे. या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्माला मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत. नवीन वर्षाची सुरूवात यजमानांना त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. दुसरा सामना जिंकला तरच कसोटी मालिका बरोबरीत सुटणार आहे. रोहित या कसोटीआधी मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये रोहित प्लेइंग 11 मध्ये जवळच्या मित्राला डच्चू देण्याची शक्यता आहे.
रोहित कोणते दोन मोठे निर्णय घेणार?
रोहित शर्मा नवीन वर्षाच्या सुरुवातीन दोन मोठ्या निर्णयांमधील एक म्हणजे पहिल्या सामन्यातील पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा याला बाहेर बसवू शकतो. पहिल्या सामन्यात तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध कृष्णा याला छाप पाडता आली नाही. त्यामुळे त्याच्या जागी रोहित मुकेश कुमार याला संधी देण्याची शक्यता आहे. वन डे मालिकेत मुकेश कुमार याने दमदार खेळ केला होता. रोहितनेही सराव सत्रामध्ये नेटमध्ये मुकेशच्या गोलंदाजीवर सराव केला होता.
दुसरा मोठा बदल म्हणजे रोहित शर्मा आर अश्विन याच्या जागी रविंद्र जडेजा याला संघात स्थान देऊ शकतो. पहिल्या सामन्यात जडेजा खेळू शकला नाही, आता तो पूर्णपणे फिट असल्याने अश्विनला प्लेइंग 11 मधून वगळलं जावू शकतं. पहिल्या सामन्यात अश्विनला एकच विकेट घेता आली होती.
केप टाऊनमधील टीम इंडियाची कामगिरी
टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत सहा सामने खेळले असून त्यामधील दोन सामने अनिर्णित तर चार सामन्यात पराभव झाला आहे. अजुनही या मैदानावर विजयी पताका लावली नाही. रोहित शर्मा अँड कंपनीकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे.
दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11 :
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, पूर्ण कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सि, मुकेश कुमार, शार्दुल ठाकुर