SA vs IND 3rd T20 | दुसऱ्या टी-20 मधील पराभवानंतर सूर्याने संघातील खेळाडूंना स्पष्टच सांगितलं, म्हणाला…

Suryakumar Yadav on 3rd t20 : टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याला पराभव जिव्हारी लागलेला दिसत आहे. कारण तिसऱ्या सामन्याआधी सूर्याने संघातील सर्व खेळाडूंना एक गोष्ट सांगितली आहे. सामना जिंकायचा असेल तर ती गोष्ट करायलाच हवी असं स्पष्ट शब्दात सांगितलं.

SA vs IND 3rd T20 | दुसऱ्या टी-20 मधील पराभवानंतर सूर्याने संघातील खेळाडूंना स्पष्टच सांगितलं, म्हणाला...
Suryakumar Yadav
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 7:30 PM

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आफ्रिकेने 5 विकेटने विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 19.3 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या होत्या. सामना सुरू असताना पावसाने खोडा घातला आणि डकवर्थ लुईस नुसार आफ्रिकेच्या संघाला 15 ओव्हरमध्ये 154 धावांचां सुधारित लक्ष्य देण्यात आलं होतं. या लक्ष्याचा बचाव करताना टीम इंडियाला अपयश आलं होतं. पावसामुळे चेंडू आफ्रिकेच्या फलंदाजांच्या बॅटवर चांगला येत होता त्यामुळे टीम इंडियाची गोची झाली होती. अशातच सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यासाठी प्लॅन रेडी असल्याचं सांगितलं आहे.

सूर्या काय म्हणाला?

टीममधील सर्व खेळाडूंना सांगितलं आहे की, मालिका बरोबरीत सोडवायची असेल तर पॉवर प्ले चा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. आफ्रिकेच्या संघाने पहिल्या पाच ते सहा ओव्हरमध्ये दमदार कामगिरी करत सामन्यावर पकड मिळवली होती. आम्हीसुद्धा अशाच प्रकारचा खेळणार असून तिसऱ्या टी-20 सामन्याची वाट पाहत असल्याचं सूर्या म्हणाला.

आम्ही केलेला स्कोर काही खराब नव्हता मात्र गोलंदाजी करणं आव्हानात्मक झालं होतं. संघातील सहकारी खेळाडूंना कन्मर्ट झोनमधून बाहर पडून खेळावं लागणार असल्याचं सांगितलं. ड्रेसिंग रूममधील वातवरण जर उत्साही असावं. त्यासाठी मैदानावर जे काही होईल ते तिथेच सोडायचं, असं सूर्याने सांगितलं.

दरम्यान, 14 डिसेंबर म्हणजे गुरूवारी हा सामना होणार असून संघाच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही सलामीवीर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाले होते. त्यामुळे ऋतुराज गायकवाड याला संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

3 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सन , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.