IND vs SA 5th T20 Weather Report: आज पाऊस ‘फायनल’चा खेळ बिघडवणार? जाणून घ्या टॉसच्या वेळी कसं असेल बंगळुरुतील हवामान

IND vs SA 5th T20 Weather Report: आजचा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. सगळ्यांच्या नजरा फायनल मॅचकडे लागल्या आहेत. मात्र आजच्या सामन्यातमान हवामान सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

IND vs SA 5th T20 Weather Report: आज पाऊस 'फायनल'चा खेळ बिघडवणार? जाणून घ्या टॉसच्या वेळी कसं असेल बंगळुरुतील हवामान
IND vs SAImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 1:25 PM

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) रविवारी बेंगळुरुत सीरीजमधील पाचवा टी 20 सामना खेळला जाणार आहे. मालिकेतील हा अंतिम सामना आहे. दोन्ही टीम्स हा सामना जिंकण्यासाठी आपली ताकत पणाला लावतील. कारण सध्या मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) पहिले दोन सामने जिंकले, तर भारताने पिछाडीवरुन कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली. आजचा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. सगळ्यांच्या नजरा फायनल मॅचकडे लागल्या आहेत. मात्र आजच्या सामन्यातमान हवामान सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष खेळाबरोबर हवामानाकडेही (Weather) असेल. टीम इंडियाने पिछाडीवरुन ज्या पद्धतीन कमबॅक केलय, त्यामुळे आजच्या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे. भारतीय संघाला मालिका विजयाची संधी आहे. पण आजच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो. या सामन्यात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. संपूर्ण दिवसभर आकाशात ढग असतील.

टॉसच्यावेळी वातावरण बिघडण्याचा अंदाज

आज संध्याकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. यावेळी हवामान आणखी बिघडण्याची शक्यता आहे. एक्यवेदरनुसार, बंगळुरुमध्ये रविवारी संध्याकाळी 7 वाजता पाऊस कोसळण्याची शक्यता 51 टक्के आहे. त्यामुळे सामना उशिराने सुरु होऊ शकतो. त्यानंतरही आकाश निरभ्र होण्याची शक्यता कमी आहे. 8 वाजता 47 टक्के आणि त्यानंतर 35 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

बंगळुरुच्या स्टेडियमचा रेकॉर्ड काय?

बंगळुरुच्या ज्या स्टेडियमवर मॅच होणार आहे, तिथे आतापर्यत 8 इंटरनॅशनल सामने झाले आहेत. त्यावेळी 5 वेळा लक्ष्याचा पाठलाग करताना टीम जिंकली आहे. 3 वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना या पीचवर सरासरी धावसंख्या 153 आहे. मागचा चौथा टी 20 सामना भारताने जिंकला. या मॅचमध्ये दिनेश कार्तिक आणि आवेश खानने जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. कार्तिकने 55 धावा फटकावल्या. आवेश खानने चार विकेट घेतल्या. भारताने 82 धावांच्या मोठ्या फरकाने चौथा सामना जिंकला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.