AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: फायनल मॅचमध्ये कशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग-11, श्रेयस अय्यरला बाहेर बसवणार?

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) रविवारी बेंगळुरुत सीरीजमधील पाचवा टी 20 सामना खेळला जाणार आहे. मालिकेतील हा अंतिम सामना आहे. दोन्ही टीम्स हा सामना जिंकण्यासाठी आपली ताकत पणाला लावतील.

IND vs SA: फायनल मॅचमध्ये कशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग-11, श्रेयस अय्यरला बाहेर बसवणार?
Rahul dravid-Rishabh pant Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 10:47 AM

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) रविवारी बेंगळुरुत सीरीजमधील पाचवा टी 20 सामना खेळला जाणार आहे. मालिकेतील हा अंतिम सामना आहे. दोन्ही टीम्स हा सामना जिंकण्यासाठी आपली ताकत पणाला लावतील. कारण सध्या मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकले, तर भारताने पिछाडीवरुन कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली. आजचा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. आता भारतीय कर्णधार ऋषभ पंतसमोर फायनलसाठी प्लेइंग 11 निवडण्याचं आव्हान असेल. पहिले दोन सामने गमावल्यानंतर हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कॅप्टन ऋषभ पंतने (Rishabh Pant) संघात कुठलाही बदल केला नव्हता. आता फायनलमध्ये संघात बदल करणारा का? हा प्रश्न आहे. मागच्या 4 सामन्यात जे खेळाडू चालले नाहीत, त्यांना बाहेर बसवणार का? हा प्रश्न आहे.

पंत आणि अय्यर आज तरी धावा करतील का?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकने दमदार फलंदाजी केली होती. हर्षल पटेल, आवेश खान आणि युजवेंद्र चहल फॉर्ममध्ये परतले आहेत. सुरुवातीच्या दोन सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतर ऋतुराज गायकवाडने तिसऱ्यासामन्यात हाफ सेंच्युरी झळकवली. चौथ्या मॅच मध्ये तो फक्त एक रन्स करु शकला. इशान किशनने पहिल्या सामन्यात 76, दुसऱ्या मॅचमध्ये 34, तिसऱ्या सामन्यात 54 आणि चौथ्या सामन्यात 27 धावा केल्या. या सीरीजमध्ये कोणाला सूर गवसाल नाहीय, तर तो आहे कॅप्टन ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर.

श्रेयसच्या जागी या खेळाडूला मिळू शकते संधी

कॅप्टन ऋषभ पंत मागच्या चार सामन्यात बेजबाबदार फटका खेळून एकाच प्रकारच्या चेंडूवर आऊट झाला आहे. त्याने सीरीजमध्ये 29,5,6 आणि 17 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सीरीजमध्ये 40,36, 14 आणि 4 धावा केल्या. त्यामुळे फायनलमध्ये पंत अय्यरच्या जागी दुसऱ्या कोणाला संधी देणार का? हे आज कळेल. ऑलराऊंडर दीपक हुड्डा संधीच्या प्रतिक्षेत आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने सरस खेळ केला होता.

हे सुद्धा वाचा

अशी असू शकते टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

ऋषभ पंत (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर/दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि युजवेंद्र चहल

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.