AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: हार्दिक पंड्या ते दिनेश कार्तिक, Rahul Dravid यांची आजच्या पत्रकार परिषदेतली 5 मोठी विधान

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) येत्या 9 जूनपासून पाच T 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सीरीजमधील पहिला सामना होईल.

IND vs SA: हार्दिक पंड्या ते दिनेश कार्तिक, Rahul Dravid यांची आजच्या पत्रकार परिषदेतली 5 मोठी विधान
Head Coach Rahul dravid Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 7:04 PM

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) येत्या 9 जूनपासून पाच T 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सीरीजमधील पहिला सामना होईल. भारताला हा सामना जिंकून टी 20 मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. गुरुवारी होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची आज पत्रकार परिषद झाली. टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि दिनेश कार्तिक यांच्याबद्दल महत्त्वाचं विधान त्यांनी केलं. या सीरीजमध्ये कॅप्टनच्या रोलमध्ये असलेल्या केएल राहुलच्या धीम्या गतीने फलंदाजी करण्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. टीम इंडियात पहिल्यांदाच निवड झालेल्या उमरान मलिकबद्दलही राहुल द्रविड बोलले.

  1. “हार्दिक पंड्यासारख्या ऑलराऊंडरच संघात पुनरागमन ही एक चांगली बाब आहे. संपूर्ण आयपीएलमध्ये त्याने कमालीच नेतृत्व केलं. त्याच्या क्षमतेचा योग्य वापर करुन घेणं, आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगचा आम्हाला फायदा करुन घ्यावा लागेल” असं राहुल द्रविड म्हणाले.
  2. दिनेश कार्तिकची संघात निवड का केली? त्या प्रश्नाचं उत्तर द्रविड यांनी दिलं. “दिनेश कार्तिकचा रोल एकदम स्पष्ट आहे. आयपीएलमध्ये त्याची जशी मॅच फिनिशरची भूमिका होती. आता सुद्धा त्याचा तोच रोल असेल”
  3. उमरान मलिकबद्दल राहुल द्रविड म्हणाला की, “त्याच्याकडे वेग आहे. प्रत्येक सेशनमध्ये तो सुधारणा करतोय. त्याला अजून बरच काही शिकायचं आहे”
  4. केएल राहुलच्या धीम्या गतीने फलंदाजी करण्यावरही राहुल द्रविडने भाष्य केलं. “आम्हाला चांगली सुरुवात हवी आहे. आम्ही आमच्या टॉप 3 खेळाडूंना ओळखतो. जास्त धावा करायच्या असतील, तर त्यांनी त्यांचा स्ट्राइक रेट चांगला ठेवणं आवश्यक आहे”
  5. भारताला टी 20 मध्ये सलग 13 वा सामना जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. त्यावर द्रविड म्हणाले की, “सलग 13 विजय मिळवण्यावर आमचं लक्ष्य नाहीय. चांगलं खेळलो तर आम्ही जिंकू, नाहीतर शिकण्याची संधी असेल”
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.