Ind vs sa 2nd test | विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी भर मैदानात खेळली फुगडी, पाहा व्हिडीओ
Shubman Gill & Virat Kohli Viral Video : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसरा कसोटी सामना एखाद्या स्क्रिप्टसारखा सुरू आहे असं वाटत आहे. एकाच दिवशी दोन्ही संघ ऑल आऊट त्यानंतर दुसऱ्या डावातही तीन विकेट पडल्या आहेत. अशातच विराट कोहली आणि गिल यांचा फुगडी खेळतानाता व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील केप टाऊनची खेळपट्टीने फलंदाजांना धडकी भरवणारी आहे. एकाच दिवशी तेवीस विकेट पडल्या आहेत. टीम इंडियाने आफ्रिकेला 55 वर ऑल आऊट केलं त्यानंतर टीम इंडियासुद्धा 153 वर ऑल आऊट झाली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या आफ्रिकेच्या तीन विकेट गेल्या असून टीम इंडियाकडे आता 36 धावांची आघाडी आहे. अशातच शेवटच्या सत्रातील विराट कोहली आणि शुबमन गिल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये:-
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि युवा खेळाडू शुबमन गिल दोघेही एकमेकांच्या हातात देत गोल फिरत उड्या मारत आहेत. महाराष्ट्रात याला फुगडी असं म्हटलं जातं. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दोघांच्या व्हिडीओवर अनेक मीम्स व्हायरल केले आहेत.
पाहा व्हिडीओ
kohli boy you have a 2 y/o kid yourself 😭❤️pic.twitter.com/KiYiL3AeGi
— 🧑🏻🦯 (@murdockdrive) January 3, 2024
दरम्यान, आता मैदानात एडन मार्करम आणि डेव्हिड बेडिंगहॅम नाबाद असून अनुक्रमे 36 आणि 7 धावांवर खेळत आहेत. टीम इंडियाच्या मुकेश कुमार याने डीन एल्गर आणि टोनी डी झोर्झी यांना आऊट केलं आहे. तर जसप्रीत बुमराह याने ट्रिस्टन स्टब्स याला माघारी पाठवलं आहे. दुसऱ्या दिवशी दोघे भागीदारी वाढवतात की टीम इंडियाचे गोलंदाज परत एकदा ऑल आऊट करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार