IND VS SL: रवींद्र जाडेजा Playing 11मध्ये खेळणार हे निश्चित, मग तिघांपैकी बाहेर कोण बसणार? अशी असू शकते प्लेइंग इलेवन

भारत आणि श्रीलंकेमधील टी-20 सीरीजला (India vs Sri Lanka, 1st T20) येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये खेळला जाईल.

IND VS SL: रवींद्र जाडेजा Playing 11मध्ये खेळणार हे निश्चित, मग तिघांपैकी बाहेर कोण बसणार? अशी असू शकते प्लेइंग इलेवन
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 7:34 PM

लखनऊ: भारत आणि श्रीलंकेमधील टी-20 सीरीजला (India vs Sri Lanka, 1st T20) येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये खेळला जाईल. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचे दोन मोठे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या दोघांना टी-20 सीरीजसाठी संघात स्थान मिळालं आहे. या दोघांचं टीम मध्ये खेळणं निश्चित मानलं जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात रवींद्र जाडेजावर (Ravindra Jadeja) सगळ्यांची नजर असणार आहे. कारण मागच्या तीन महिन्यांपासून हा खेळाडू क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. जाडेजा दुखापतग्रस्त होता. पण आता तो पूर्णपणे फिट आहे. जाडेजा फिट आहे म्हणजेच तो प्लेइंग इलेवनमध्ये खेळणार हे निश्चित आहे. जाडेजा प्लेइंग इलेवनमध्ये (Playing Eleven) समावेश झाला, तर तो कोणाची जागा घेणार? हा प्रश्न आहे.

रोहितला कठीण निर्णय घ्यावे लागतील

रवींद्र जाडेजाचा संघात समावेश करताना रोहित शर्माला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. जाडेजाच्या अनुपस्थितीत वेंकटेश अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर यांना ऑलराऊंडर म्हणून संधी देण्यात आली. तिघांनी चांगली कामगिरी केली. जाडेजा संघात नसताना रवी बिश्नोई आणि युजवेंद्र चहल हे दोन फिरकी गोलंदाजांना एकत्र खेळवण्यात आलं. जाडेजा संघात परतल्यानंतर टीम एकाच स्पेशलिस्ट गोलंदाजाला संघात कायम ठेवू शकते. कारण जड्डू स्वत: उत्तम फिरकी गोलंदाज आहे.

हा फिरकी गोलंदाज बाहेर जाऊ शकतो

रवींद्र जाडेजा संघात परतल्यानंतर रवी बिश्नोईला बेंचवर बसवले जाऊ शकते. वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये बिश्नोईने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने तीन विकेट घेतल्या. युजवेंद्र चहलही चांगली गोलंदाजी करतोय. अशावेळी संघ अनुभवाला प्राधान्य देऊ शकतो.

IND VS SL अशी असू शकते संभाव्य प्लेइंग इलेवन

रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह

india vs sri lanka 1st t20 ravindra jadeja jasprit bumrah comeback probable playing 11

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.