IND vs SL 1st T20I : किशनला संधी, रोहितने तिसऱ्या क्रमांकावर खेळावं, आकाश चोप्राने निवडली Playing XI

नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 मालिकेत सलामीवीर आणि यष्टीरक्षक इशान किशनला (Ishan Kishan) मोठी कामगिरी करता आली नाही. त्यासोबत तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) सलामीला संधी देण्यात आली होती. मात्र तो त्यात अपयशी ठरला.

IND vs SL 1st T20I : किशनला संधी, रोहितने तिसऱ्या क्रमांकावर खेळावं, आकाश चोप्राने निवडली Playing XI
Team India Image Credit source: BCCI Twitter
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 3:52 PM

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 मालिकेत सलामीवीर आणि यष्टीरक्षक इशान किशनला (Ishan Kishan) मोठी कामगिरी करता आली नाही. त्यासोबत तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) सलामीला संधी देण्यात आली होती. मात्र तो त्यात अपयशी ठरला. तरीदेखील माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) या दोन्ही खेळाडूंना पाठिंबा दर्शवला आहे. या दोन्ही युवा खेळाडूंना आणखी संधी मिळावी, असं आकाशला वाटतं. वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर, आता टीम इंडिया टी-20 मालिकेत (India vs Sri Lanka, 1st T20I) श्रीलंकेशी भिडणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये होणार आहे. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माला आकाशने एक विनंती केली आहे.

आकाश चोप्राने आगामी तिन्ही सामन्यांमध्ये सलामीवीर ऋतुराज गायकवाडला संधी देण्याची विनंती कर्णधाराकडे केली. रोहित शर्माने ओपनिंगला जाऊ नये असेही आकाश चोप्राने सांगितले. यासोबतच संजू सॅमसनला तूर्तास संधी न देण्याबाबतही त्याने मत व्यक्त केले. आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, इशान किशनलादेखील संधी मिळायला हवी.

आकाश चोप्रा म्हणाला, ‘मला वाटतं ऋतुराज गायकवाड आणि इशान किशनला सलामीला संधी मिळायला हवी. आता लोक विचारतील संजू सॅमसन का नाही? माझा विश्वास आहे की जर तुम्ही इशान किशनला संधी देण्यास सुरुवात केली असेल तर तेच पुढे सुरु ठेवावे. कदाचित याचा अंत सुखद असेल. ऋतुराज आणि किशनला आणखी काही संधी मिळायला हव्यात. अवघ्या तीन सामन्यांनंतर तुम्ही खेळाडू बदलले तर त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल.

ऋतुराजने ओपनिंग करावी

आकाश चोप्राच्या मते ऋतुराज गायकवाडनेच ओपनिंग करायला हवी. आकाश म्हणाला, ‘मला ऋतुराज गायकवाडला सलामीला खेळताना पाहायला आवडेल कारण रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. ऋतुराजलाही तीन संधी मिळायला हव्यात. तसेच ऋतुराज आणि ईशान यांच्या उपस्थितीमुळे उजव्या आणि डाव्या हाताची सलामीची जोडी कायम राहणार आहे. ऋतुराजलाही संधी मिळायला हवी. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऋतुराजला संधी मिळाली होती, ज्यामध्ये तो चार धावा करून बाद झाला होता.

‘सॅमसनऐवजी दीपक हुड्डाला संधी मिळावी’

आकाश चोप्राच्या मते प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनपेक्षा दीपक हुड्डाला प्राधान्य मिळायला हवे. आकाश चोप्रा पुढे म्हणाला, ‘तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आणि पाचव्या क्रमांकावर दीपक हुडाला संधी मिळायला हवी. संजू सॅमसन टॉप ऑर्डरचा फलंदाज असताना तुम्ही त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवू नये. जर तुम्ही त्यांना टॉप ऑर्डरमध्ये संधी देऊ शकत नसाल तर तुमच्या संधी वाया घालवण्यात काही अर्थ नाही. मला वेंकटेश अय्यर 6 व्या क्रमांकावर हवा आहे. पहिल्या T20 मध्ये जडेजा देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो. आता टीम इंडिया त्याचा कुठे वापर करते हे पाहावे लागेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहदेखील मैदानात उतरू शकतो.

अशी असू शकते प्लेईंग इलेव्हन

इशान किशन, ऋतुराज गायकवाड, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह

भारताचा टी-20 संघ : भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान

इतर बातम्या

IND vs SL : ‘हिटमॅन’ शर्माकडे तीन विश्वविक्रमांची संधी, विराट, धवन, गप्टिलला मागे टाकणार?

ना रोहित, ना युवराज, IND vs SL T20 मधला सिक्सर किंग कोण? पाहा हिटिंग मास्टर्सची लिस्ट

IND vs SL : दीपक चाहरपाठोपाठ विस्फोटक फलंदाज संघाबाहेर, टीम इंडिया अडचणीत

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.