दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना आज होत आहे. या सामन्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे उर्वरित दोन सामन्यांना मुकला आहे. त्यामुळे श्रीलंकेसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
भारत श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना होत आहे. पहिला सामना बरोबरीत सुटल्याने या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. हा सामना जिंकेल त्या संघाची बाजू भक्कम होणार आहे. असं असताना या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी श्रीलंकेला धक्का बसला आहे. अष्टपैलू वानिंदु हसरंगा उर्वरित दोन्ही सामन्यातून बाहेर गेला आहे. त्यामुळे श्रीलंक संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. एकतर खेळपट्टी फिरकीला मदत करणारी आहे. दुसरं अष्टपैलू हसरंगा उर्वरित सामन्यात खेळणार नसल्याने श्रीलंकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. हसरंगाऐवजी संघात जेफरी वांडरसे याला घेतलं आहे. हसरंगाला लेफ्ट हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्याने वनडे मालिकेतून बाहेर गेला आहे. हसरंगाने पहिल्या वनडे सामन्यात 10 षटकं टाकत 3 विकेट घेतले होते. त्याचा इकोनॉमी रेट हा 5.80 इतका होता. तर फलंदाजीत 35 चेंडूंचा सामना करत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर हसरंगाच्या दुखापतीचे अपडेट दिले आहेत.
श्रीलंकन बोर्डाने लिहिलं की, ‘वानिंदु हसरंगा वनडे मालिकेतील इतर सामने खेळणार नाही. कारण त्याच्या डाव्या हाताला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. पहिल्या सामन्यात 10 व्या षटकाच्या शेवटचा चेंडू टाकताना त्याला डाव्या हातात दुखापत जाणवली. त्यानंतर खेळाडूचं एमआराय करण्यात आलं त्यात दुखापत असल्याचं स्पष्ट झालं आहे.’
🚨 Wanindu Hasaranga will miss the remainder of the ODI series, as the player has suffered an injury to his left hamstring. 🚨
He experienced pain in his left hamstring while delivering the last ball of his 10th over during the first ODI.
An MRI performed on the player,… pic.twitter.com/BWcv6l4k3a
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 3, 2024
पहिल्या सामन्यात श्रीलंकेने 230 धावा करत विजयासाठी 231 धावांचं लक्ष्य टीम इंडियासमोर ठेलं होतं. पण भारतीय संघ 230 धावा करू शकला. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात रोहित शर्माने 47 चेंडू खेळत 7 चौकार आणि 3 षटकार मारले आणि 58 धावा केल्या.
शेवटच्या दोन वनडेसाठी श्रीलंकन संघ : पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानाज, डुनिथ वेलालेज, अकिला धनंजय, मोहम्मद शिराज, असिथा फर्नांडो, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, कामिन्दु मेंडिस, निशान मदुश्का, महीश थीक्षाना , ईशान मलिंगा.