IND vs SL 2nd T20: पुण्यात टीम इंडिया का हरली? समजून घ्या 5 पॉइंट्समधून
IND vs SL 2nd T20: दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडिया का हरली? कुठले निर्णय चुकले? जाणून घ्या.
पुणे: श्रीलंकेने दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवला. पुण्यात हा सामना झाला. श्रीलंकेने 16 धावांनी हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. श्रीलंकेने टीम इंडियासमोर विजयासाठी 207 धावांच मोठं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात टीम इंडिया फक्त 190 धावा करु शकली. टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादवने हाफ सेंच्युरी झळकवली. या दोघांशिवाय शिवम मावीने 15 चेंडूत 26 धावा फटकावल्या. टीम इंडिया का हरली? पराभवामागे काय कारण आहेत? ते जाणून घ्या.
टॉस जिंकून चुकीचा निर्णय
हार्दिक पंड्याने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या मैदानात चेस करणाऱ्या टीमला भरपूर कमीवेळा विजयाची संधी मिळाली आहे. याच मैदानात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला फायदा मिळाला आहे. हार्दिकला याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा त्याने आकड्यांबद्दल माहित नसल्याचं सांगितलं.
टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप
टीम इंडियासमोर 207 धावांच लक्ष्य होतं. फलंदाजांनी मैदानात येताच आक्रमक पवित्रा घेतला. त्या गडबडीत विकेट गमावल्या. इशान किशन 2, शुभमन गिल 5 आणि राहुल त्रिपाठीने 5 धावा केल्या. फक्त 2.1 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने आपले 3 विकेट गमावले. त्यामुळे अन्य फलंदाजांवर दबाव आला.
खराब गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांनी पुण्यात निराश केलं. सर्वच गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. पावरप्लेमध्ये श्रीलंकेने 55 धावा केल्या होत्या. पहिल्या विकेटसाठी पाथुम निसंका आणि कुसल मेंडिसने 80 धावांची भागीदारी केली. शिवम मावीने 53 रन्स केल्या. उमरान मलिक 48 आणि अर्शदीप सिंहने दोन ओव्हर्समध्ये 37 धावा दिल्या.
नो बॉल बनली डोकेदुखी
भारताच्या गोलंदाजीत शिस्त दिसली नाही. टीम इंडियाने पुण्यातील या मॅचमध्ये 7 नो बॉल टाकले. एकट्या अर्शदीप सिंहने 5 नो बॉल टाकले. उमरान मलिकने सुद्ध नो बॉल टाकण्याची चूक केली. श्रीलंकन बॅट्समननी याचा पुरेपूर फायदा उचलला. श्रीलंकेने या 7 नो बॉल्सवर 30 धावा केल्या. शानकाचा तुफानी अर्धशतक
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी मीडल ओव्हर्समध्ये पुनरागमन केलं. पण श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शानकाला रोखणं जमलं नाही. शानकाने 22 चेंडूत दोन चौकार आणि सहा षटकारांसह 56 धावा केल्या. शानकाने 254.55 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली.