Rohit Sharma: …मग बुमराहच्या फिटनेसबद्दल रोहित शर्मा खोट बोलतोय का? फक्त 3 नाही, तर इतक्या मॅचसाठी बाहेर
Rohit Sharma: जसप्रीत बुमराहच्या दुखापतीची नेमकी स्थिती काय? त्याबद्दल रोहित शर्माने माहिती दिलीय. पण जसप्रीत बुमराह किती सामन्यांना मुकणार आहे?
गुवाहाटी: अनफिट…,फिट…आणि पुन्हा अनफिट, मागच्या 12 दिवसातील जसप्रीत बुमराहच्या फिटनेसची ही स्थिती आहे. BCCI ने सर्वप्रथम श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी त्याची निवड केली नाही. त्यानंतर अचानक बुमराहची ODI सीरीजसाठी टीममध्ये निवड केली आणि आता 6 दिवसानंतर बुमराह खेळणार नसल्याच स्पष्ट झालय. जसप्रीत बुमराह या दरम्यान एकही मॅच खेळला नाहीय. त्याने नेट्समध्ये फक्त काही चेंडू टाकलेत. सप्टेंबरनंतर बुमराह पुनरागमन करणार होता. NCA ने बुमराहच्या फिटनेसबद्दल हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर बीसीसीआयने त्याचा टीममध्ये समावेश केला होता. पण आता तो एकही सामना खेळण्याआधीच टीमबाहेर गेलाय.
रोहितने सांगितलं दुखापतीच कारण
बीसीसीआयच्या मते, बुमराहला पूर्णपणे फिट होण्यासाठी अजून थोडावेळ आवश्यक आहे. बोर्डाने बुमराहच्या बाहेर होण्यामागच कारण अजून सांगितलेलं नाही. कॅप्टन रोहित शर्माने प्रेस कॉन्फरन्समध्ये बुमराहच्या बाहेर होण्यामागच कारण सांगितलं. बुमराहला अजून जखडल्यासारखं वाटतय. त्यामुळेच तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये खेळणार नाहीय.
आता प्रश्न यामध्ये हा निर्माण होतोय, एकतर रोहित शर्मा खोट बोलतोय किंवा त्याला पूर्ण माहिती दिलेली नाही. असं म्हणण्यामागे काय कारण आहे, ते समजून घ्या.
रोहित काय म्हणाला?
“NCA मध्ये बुमराह खूप मेहनत करत होता. हे दुर्देवी आहे. त्याच्याबाबतीत आपल्याला आणखी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. एनसीए येथे नेट्समध्ये बॉलिंग करताना त्याची कंबर थोडी जखडल्यासारखी झाली. हे खूप साधारण आहे” असं रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला.
त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात
सप्टेंबरमध्ये बुमराह ज्या दुखापतीमुळे बाहेर गेला होता. त्यातून तो आता पूर्णपणे सावरलाय. त्यामुळेच एनसीएने त्याला फिट घोषित केलं. आता रोहितच्या विधानानुसार, दुखापत नाहीय, फक्त जखडल्यासारख झालय. म्हणजे मैदानावर परतण्यासाठी त्याला जास्त वेळ लागणार नाही. पण आता जी बातमी आलीय, ती निराश करणारी आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. 3 नाही, इतक्या मॅचसाठी बाहेर
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बुमराह फक्त श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजला मुकणार नाहीय, तर तो न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजही खेळणार नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटीत खेळणही कठीण दिसतय. 9 फेब्रुवारीपासून टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. म्हणजे बुमराह 3 नाही, तर 13 सामन्यातून बाहेर गेला आहे. श्रीलंकेविरुद्ध तीन वनडे त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यातही तो खेळणार नाही. त्याच्या दुखापतीचा इतिहास पाहता ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतही त्याचं खेळणं कठीण दिसतय. रोहित कंबर जखडण्याला साधारण म्हणतोय. मग पुनरागमनासाठी त्याला आणखी महिन्याभराचा कालावधी का लागणार? कदाचित बुमराह अजून पूर्णपणे दुखापतीमधून सावरलेला नसेल.